Reshim Sheti 
सोलापूर

"रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी वरदान !' हिरज येथे पुढील वर्षी होणार प्रशिक्षण व रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू 

श्याम जोशी

दक्षिण सोलापूर (सोलापूर) : तुती लागवडीतून रेशीम शेती केल्यास चांगल्या उत्पन्नाची हमी असल्याने शेतकरी वर्गासाठी रेशीम शेती वरदानच ठरते, असे मत जिल्हा रेशीम अधिकारी मच्छिंद्र राऊत यांनी व्यक्त केले. 

जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथे रेशीम शेतीबाबत शेतकऱ्यांसाठी नुकतीच प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे उद्‌घाटन जिल्हा रेशीम अधिकारी मच्छिंद्र राऊत यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रकल्प अधिकारी शिवानंद जोजन, श्रीराम इप्पर, शिवानंद वाडकर, कृष्णात आदलिंगे, संतोष गडगी आदींसह रेशीम कार्यालयातील कर्मचारी वर्ग व सुशिक्षित बेरोजगार युवकांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीराम इप्पर यांनी प्रास्ताविक केले. रेशीम शेतीतील यशस्वी शेतकरी कृष्णात आदलिंगे यांनी आपले अनुभव सांगितले. 

श्री. राऊत पुढे म्हणाले, सध्या सुशिक्षित युवकांनी नोकरीच्या मागे न लागता रेशीम उद्योग करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. रेशीम उद्योग हा शाश्वत शेती व्यवसाय असल्याने पारंपरिक शेतीबरोबरच रेशीम शेतीचा पर्याय निवडावा. या व्यवसायाद्वारे उत्पन्नाची हमी मिळणार असल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान नक्कीच उंचावणार आहे. 

हिरज येथे होणार प्रशिक्षण व रेशीम कोष खरेदी केंद्र 
दुसऱ्या सत्रात प्रकल्प अधिकारी शिवानंद जोजन यांनी रेशीम उद्योग यशस्वी करण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रमाची माहिती दिली. त्यामध्ये गुणवत्ता, कीटक संगोपन, प्रशिक्षण, निर्जंतुकीकरण आदी बाबींची दक्षता घेतल्यास रेशीम उद्योग यशस्वी होण्यास मदत मिळणार आहे. तसेच 2021 मध्ये हिरज येथे प्रशिक्षण केंद्र व रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू होणार असल्याने पुढील काळात नवीन शेतकरी वर्गांना त्याचा फायदा होणार असल्याचेही श्री. जोजन यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्य सरकारचा माेठा निर्णय! 'गुन्हा लपविल्यास मुख्याध्यापकासह व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा'; जबाबदारी केली निश्‍चित..

मोठी बातमी! कमी पटाच्या झेडपी शाळांवर कंत्राटी शिक्षक; ७० वर्षांपर्यंतच्या सेवानिवृत्त शिक्षकांची २० हजार रुपयांच्या मानधनावर होईल नेमणूक

Pune News : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून पुण्याला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्याचा उपक्रम; शहराच्या सर्वांगीण विकासावर फडणवीसांचा जोर!

Pune Truck Accident : ट्रकच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू; कात्रज-कोंढवा रस्त्यावरील घटना!

Hadapsar OPD Closure : हडपसरमधील बाह्यरुग्ण सेवा बंद; डॉक्टरांचा तोडफोडी विरोधातील इशारा!

SCROLL FOR NEXT