Truck
Truck Sakal
सोलापूर

आष्टी शिवारातुन चोरीला गेलेला ट्रकचा चोवीस तासात छडा

राजकुमार शहा

मोहोळ - मालट्रक चालकाचे हातपाय बांधून त्याला उसाच्या शेतात टाकून त्याच्या डोक्याला बंदूक लावून व तलवारीचा धाक दाखवून त्याच्या ताब्यातील 12 टन वजनाची सळईसह मालट्रक घेऊन गेलेल्या प्रकरणातील अज्ञात चोरट्याला मोहोळ पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 13 लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, शनिवार तारीख 4 जून रोजी पंढरपूर-कुर्डुवाडी महामार्गावरील आष्टी शिवारातील माळी वस्ती जवळ जालन्याहून सांगलीकडे सळई घेऊन जाणारा ट्रकचा चालक प्रवीण सरगर याने लघुशंकेसाठी पहाटे तीन वाजता ट्रक थांबविला त्यावेळी अचानक एक इंडिका कार आली त्यातून सहा जण उतरले व त्यांनी प्रवीण यास हातपाय बांधून त्याला उसाच्या शेतात टाकले त्याच्या डोक्याला बंदूक लावून तलवारीचा धाक दाखवून त्याच्या ताब्यातील रोख रक्कम वीस हजार व सळई सह मालट्रक असा एकूण 13 लाख 61 हजार रुपयाचा माल त्यांनी चोरून नेला. याबाबत प्रविण सरगर यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली होती.

गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ चे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन माने, शरद ढावरे, पोलीस नाईक प्रवीण साठे, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धार्थ मोरे, पांडुरंग जगताप, हरिदास थोरात, सायबर शाखेचे युसुफ पठाण यांची दोन पथके तपासासाठी तयार करून पाठविली.

तपास पथकाने भूम, परंडा, वाशी, तेरखेडा या ठिकाणी तपास केला. गुप्त बातमीदारा मार्फत माहिती काढली असता सदर च्या गुन्ह्यातील सळई सह ट्रक हा येणेगाव ता परंडा शिवारात असल्याचे समजले. तात्काळ त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता सळई सह ट्रक क्रमांक एम एच 10 झेड 1352 ही मिळून आली, ती पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डुणगे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT