Tushar Shinde sakal
सोलापूर

Indian Forest Service Exam : कंदरचा तुषार शिंदे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस या परीक्षेत देशात 36 वा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस या परीक्षेत तुषार श्रीहरी शिंदे हा देशात 36 वी रँकने उत्तीर्ण झाला.

आण्णा काळे

करमाळा - कंदर (ता. करमाळा) येथील तुषार श्रीहरी शिंदे हा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस या परीक्षेत देशात 36 वी रँकने उत्तीर्ण झाला आहे. तुषार शिंदे यांने यापूर्वी यूपीसीची चार वेळा परिक्षा दिले असून दोन वेळा त्यांनी यूपीएससीची मुलाखत दिली आहे. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसच्या पहिल्याच प्रयत्नात ते 36 व्या रँक ने उत्तीर्ण झाले आहेत. यानंतरही यूपीएससी देणार असल्याचे त्यांनी सकाळची बोलताना सांगितले आहे.

तुषार शिंदे हे कंदर येथील शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले आहेत. त्यांचे वडील शेती करतात. त्यांना फक्त तीन एकर शेती आहे. त्या तीन एकर शेती पैकी दीड एकर शेती पडीक आहे, तर दीड एकर शेती वडील असतात. अतिशय हालाखीच्या परिस्थितीतून त्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे सातवीपर्यंत शिक्षण कंदर येथे झाले आहे. सातवी ते दहावीपर्यंत शिक्षण इंदापूर येथे झाले आहे. त्याच्यानंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले. दोन वर्ष बारामती येथील डायनामिक डेअरीत नोकरी केली.

मात्र, तुषार शिंदे मनामध्ये आपण स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हावे ही जिद्द ठेवून त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरुवात केला. त्यांची सार्थीमार्फत दिल्ली येथे निवड झाल्यानंतर सुरुवातीला काही दिवस त्यांनी दिल्ली येथे अभ्यास केला. त्याच्यानंतर पुणे आणि कोरोनाच्या कालावधीत त्यांनी कंदर येथे घरी राहूनच अभ्यास केला आहे. तुषार शिंदे ये करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रंगनाथ शिंदे यांचे भाऊ आहेत. तुषार शिंदे उत्तीर्ण झाल्याची बातमी समजताच कंदर येथे फटाके वाजवून ग्रामस्थांनी आनंद साजरा केला.

यूपीएससी किंवा एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजेत की आपल्याला हे मिळवायचा आहे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजेत. तुमच्यामध्ये जर क्षमता असेल आणि कष्ट करण्याची तयारी ठेवली तर कुठलीही स्पर्धा परीक्षा कधीही अवघड असू शकत नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांनी आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर केला पाहिजे. मी चार वेळा यूपीएससीचे दिली. त्याच्यानंतर मी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची ही पहिली परीक्षा दिली त्यात मला हे यश मिळालेले आहे. यापुढे मी यूपीएससी साठी प्रयत्न करणार आहे.मला यश मिळवण्यामध्ये माझ्या आई-वडिलांचा मोठा वाटा आहे.

- तुषार शिंदे, कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT