esakal
सोलापूर

आळंदीच्या माऊलीला पंढरीत लुटले

सकाऴ वृत्तसेवा

पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पंढरपूर (सोलापूर) : आळंदी (Alandi) येथून पंढपुरात (pandharpur)आलेल्या एका कार चालकाला दोन अज्ञात चोरटयांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये कार चालकाचा एक मोबाईल, खिशातील रोख 13 हजार रुपये यासह इतर कागदपत्रे लुटून नेली आहेत. या प्रकरणी मल्लिकार्जून (माऊली) म्हेत्रे यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (two of some items from a car driver who came to pandharpur from alandi thieves have stolen)

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मल्लिकार्जून म्हेत्रे (रा.आळंदी जि.पुणे) हे आपल्या टाटा इंडिका विस्टा कार गाडीतून (एम.एच- 14डीए-6052) मंगळवेढा येथे आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघाले होते. 26 जुलै रोजी रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास त्यांनी चंद्रभागा नदीवरील पूल ओलांडून शहरात प्रवेश केला असता त्याच वेळी मागून मोटारसायकवरुन आलेल्या अज्ञात दोघा चोरट्यांनी मोटार सायकल अडी लावून गाडी थांबवली.

गाडी थांबतचा चोरटयांनी गाडीचा दरवाजा उघडून खिशातील एक मोबाईल आणि 13 हजार रुपये रोख असा सुमारे 20 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. फिर्यादीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, चोरटे चाकूचा धाक दाखवून पसार झाले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरटया विरोधात गु्न्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण पवार करत आहेत. आषाढी वारीच्या तोंडावर असे लुटीचे प्रकार पंढरपूर शहर व परिसरातील प्रमुख मार्गावर वाढू लागले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त सुरु करावी, अशी मागणी भाविकांमधून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT