Bank Roberry 
सोलापूर

उघडेवाडीत अज्ञात चोरट्यांनी केला बॅंकफोडीचा अयशस्वी प्रयत्न ! सततच्या घटनांमुळे पोलिसांपुढे आव्हान

अशोक पवार

वेळापूर (सोलापूर) : उघडेवाडी (ता. माळशिरस) येथील बॅंक ऑफ बडोदाच्या शाखेत सोमवारी रात्री शटर उचकटून बॅंक लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. यात अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम चोरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भर लोकवस्तीत असलेली बॅंक फोडून चोरटे बॅंकेत घुसल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

याबद्दल सविस्तर माहिती अशी, की बॅंक ऑफ बडोदा, उघडेवाडी शाखेचे शाखाधिकारी निखिल सहारे (वय 36) यांनी वेळापूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार लोकवस्तीत सोमवारी (ता. 22) रात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बॅंकेचे दोन्ही शटर उचकटून आत प्रवेश केला. बॅंकेच्या लॉकरमधील रोकड चोरट्यांना काढता न आल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय रेगुडे करीत आहेत. 

वेळापूरमधील शिक्षक कॉलनीतील राहुल सोनवणे यांच्या घरात दिवसा घुसून सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना ताजी असतानाच उघडेवाडीतील बॅंक फोडीची घटना घडली आहे. गेल्या वर्षभरात बोंडले डीसीसी बॅंक शाखा फोडणे, जिल्हा परिषद मुलींच्या शाळेतील आठ संगणकांची चोरी, वेळापूर शिक्षक कॉलनीत राहणारे आरोग्य कर्मचारी सुनील पुलगेट यांची दिवसा घरफोडी होऊन सुमारे सात लाखांचा ऐवज लंपस झाला तर भाईनाथ नगरमधील संजय बनकर यांचे राहते घर फोडून मोठा ऐवज चोरीला गेला होता. यासह दुकान फोडीच्या आणि महिलांच्या गळ्यातील दागिने दिवसा पळवण्याच्या घटनाही वारंवार घडत आहेत. 

गेले काही दिवस वेळापूर आणि परिसरात घरफोडी आणि बॅंक फोडीच्या घटना वारंवार घडत असताना अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे लागले नाहीत. अशा घटना थांबवण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Pune News: पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची धामधूम; पारंपरिक ते आधुनिक वस्तू; इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, गृहखरेदीचा उत्साह

ACB Arrest Nashik : ZP च्या महिला अभियंत्याला 50 हजारांची लाच घेताना अटक; आमदारांच्या तक्रारीनंतरही सुधारल्या नाहीत, कोण आहेत वैशाली ठाकरे?

Pandharpur : नववर्षाच्या स्वागताला सावळ्या विठुरायाचे मंदिर सजले; गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात भक्तांची मांदियाळी, पांडुरंगाला अर्पण केला 5 किलो वजनाचा साखरेचा हार

Dhananjay Sawant Accident : भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर, जीवित हानी टळली

SCROLL FOR NEXT