उजनी धरण
उजनी धरण  esakal
सोलापूर

उजनी धरण मायनस ४१ टक्के! सोलापूरसाठी उजनीतून 10 मेपासून पाणी सोडण्यासंदर्भात महापालिकेचे जलसंपदा विभागाला पत्र; औज बंधाऱ्यात 25 दिवस पुरेल एवढेच पाणी

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरासाठी २० मेपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा सध्या औज बंधाऱ्यात आहे. त्यामुळे १० मेपासून उजनी धरणातून पाणी सोडावे, अशा मागणीचे पत्र महापालिकेने जलसंपदा विभागाला दिले आहे.

उजनी धरण सध्या उणे ४०.४५ टक्क्यांवर असून धरण उणे ५२ टक्के झाल्यावर महापालिकेला त्याठिकाणी तिबार पंपिंगची यंत्रणा उभारावी लागणार आहे. त्यासाठी तब्बल दोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सध्या धरणातून दुबार पंपिंग सुरू आहे. औज बंधाऱ्यात सध्या दोन मीटर तर चिंचपूर बंधाऱ्यात साडेतीन मीटर पाणी आहे. साधारणत: पाच ते सहा दिवसाला एक मीटर पाणी संपते, अशी सद्य:स्थिती आहे.

उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी औज बंधाऱ्यात यायला किमान १० दिवस लागतात. आता दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नदीत ठिकठिकाणी खड्डे मारल्याची स्थिती आहे. त्यामुळे नदीचे पाणी औज बंधाऱ्यात यायला दोन दिवस वाढीव लागतील, असा अंदाज महापालिका अधिकाऱ्यांचा आहे. त्यामुळे १० मे दरम्यान धरणातून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात यावे असे पत्र महापालिकेने जलसंपदा विभागाला दिले आहे.

जिल्हाभर अवकाळी पण, ना धरणात ना बंधाऱ्यात आले पाणी

सोलापूर जिल्ह्यात पाच- सहा दिवसांपासून अवकाळी पाऊस पडतोय. त्यात सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, माळशिरस, मोहोळ, मंगळवेढा व माढा, सांगोला या सहा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष, आंबा, केळी, डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे दोन दिवसांत करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. मात्र, या अवकाळी पावसाचे पाणी ना उजनी धरणात आले ना सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज, हिप्परगा, चिंचपूर बंधाऱ्यात आले अशी स्थिती आहे.

उजनीतून पाणी सोडण्यासंदर्भात जलसंपदा विभागाला पत्र

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यात सध्या साडेतीन मीटरपर्यंत पाणी आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून सोडलेले भीमा नदीतील पाणी २० मेपर्यंत बंधाऱ्यात पोचेल या नियोजनाने सोडावे असे पत्र जलसंपदा विभागाला आम्ही दिले आहे.

- व्यंकटेश चौबे, सार्वजनिक आरोग्य अभियंता, सोलापूर महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT