Ujani-Dam Water
Ujani-Dam Water sakal
सोलापूर

'उजनीचे पाणी पळविले तर पालकमंत्र्याला जिल्हयात फिरू देणार नाही' - सुशील क्षीरसागर

राजकुमार शहा

उजनी धरणातील पाणी इंदापूर तालुक्यातील उपसा सिंचन योजनेला पळविणे हा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यावर अन्याय आहे, यापूर्वीही असाच प्रकार झाला होता.

मोहोळ - उजनी धरणातील पाणी इंदापूर तालुक्यातील उपसा सिंचन योजनेला पळविणे हा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यावर अन्याय आहे, यापूर्वीही असाच प्रकार झाला होता. मात्र, जनरेट्यापुढे तो प्रशासनाला रद्द करावा लागला होता. जिल्ह्यातील आष्टी, शिरापूर, सीना माढा, या उपसा सिंचन योजनेसह अनेक योजना अपुऱ्या आहेत. तसेच, मोहोळ शहराचा पाणी प्रश्न तसाच लटकला आहे. त्यासाठी शासन निधी देत नाही. मात्र, इंदापूर तालुक्याला पाणी न्यावयाचे म्हणल्यावर त्यासाठी 348 कोटीचा निधी मंजूर केला आहे. हा कुठला न्याय, उजनीतील सर्व पाण्याचे वाटप झाले आहे. अशा परिस्थितीत उजनी जलाशयातील पाण्यावर पालकमंत्री दत्ता भरणे यांनी पुन्हा एकदा दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे, हा आदेश रद्द न झाल्यास पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नसून पालकमंत्र्याला व मोहोळच्या आमदारला हीच कामगिरी दिली आहे काय? असे प्रतिपादन भाजपचे शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर यांनी केले.

उजनी धरणातील पाणी इंदापूर तालुक्यातील लाकडी- निंबोडी योजनेसाठी देण्याच्या निषेधार्थ मोहोळ भाजपच्या वतीने मोहोळ येथील तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना क्षीरसागर बोलत होते.

यावेळी तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण, शंकर वाघमारे, सुशील क्षीरसागर, बाळासाहेब पाटील, बाबासाहेब जाधव, विष्णू चव्हाण, दिलीप गायकवाड, धनंजय मोहोळकर, औदुंबर वाघमोडे, दिनेश गडदे, महेश सोनी, अविनाश पांढरे, उत्तम मुळे, श्रीकांत शिवपुजे, हनुमंत कसबे, मुजीब मुजावर, स्वाभिमानीचे पप्पू पाटील, अतुल खुपसे, विष्णु चव्हाण, पद्माकर देशमुख, संतोष नामदे, दीपक गवळी आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

उजनीचे पाणी पळविणे म्हणजे हा झोपेत डोक्यात दगड घालण्याचा प्रकार आहे, यावर एक ही लोकप्रतिनिधी बोलण्यास तयार नाही. मोहोळ चे आमदार यशवंत माने यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी असे ही क्षीरसागर म्हणाले. यावेळी अतुल खुपसे, पप्पु पाटील, शंकर वाघमारे, दिलीप गायकवाड, हनुमंत कसबे यांनी मनोगते व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT