Solpur Vidhyapeeth.jpg 
सोलापूर

विद्यापीठाचे नवे संकेतस्थळ ! घरबसल्या सुटणार आता विद्यार्थ्यांच्या तक्रारी 

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने सर्व घटकांच्या सोयीसाठी, त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी विद्यापीठाच्या su.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर 'उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ सोलापूर' ही विशेष लिंक तयार केली आहे. विद्यार्थ्यांसह नागरिकांना इंग्रजी व मराठीतून प्रश्न मांडता येणार असून ही लिंक आज (ता. 9) सायंकाळी सहा वाजता सुरू केली जाणार आहे. दरम्यान, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे शुक्रवारी (ता. 12) सोलापूर विद्यापीठात येणार आहेत, अशी माहिती कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. 

राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत 'उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ सोलापूर' हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी शुक्रवारी सकाळी 11 वाजता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात उपस्थित राहणार आहेत. ते विद्यापीठात प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक संस्थांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. त्यानंतर त्यावर कशाप्रकारे तोडगा काढता येईल, यादृष्टीने नियोजन करणार आहेत. महाविद्यालये सुरु करण्याच्या निमित्ताने त्यांचा हा महत्त्वाचा दौरा मानला जात आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर 'उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ सोलापूर' ही विशेष लिंक तयार करण्यात आली असून त्यावर सर्वांना त्यांचे प्रश्‍न मांडता येणार आहेत. त्याठिकाणी निवेदनाची सॉफ्ट कॉपी जोडण्याचीही व्यवस्था करुन देण्यात येणार आहे. त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्राशी संबंधित निवेदने गुरुवारपर्यंत (ता. 11) विद्यापीठाला त्या लिंकवर पाठवावीत, असे आवाहन कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी केले आहे. 

गुणवाढीच्या प्रकरणावर होईल आढावा 
एमबीए असो वा अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील काही विद्यार्थ्यांचे गुण वाढविल्याचे प्रकरण नुकतेच उजेडात आले असून तत्कालीन परीक्षा नियंत्रकासह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील हा पहिलाच प्रकार नसून यापूर्वीही असे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यावर कशाप्रकारे मार्ग काढता येईल, जेणेकरुन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होणार नाही. यासंबंधी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यावेळी आढावा घेतील, अशी शक्‍यता आहे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

SCROLL FOR NEXT