damage
damage 
सोलापूर

अवकाळीचा सलगर परिसराला दणका ! आंबे भुईसपाट, डाळिंबाची कळी गळाली, बेदाणा निर्मितीवर परिणाम 

महेश पाटील

सलगर बुद्रूक (सोलापूर) : सलगर बुद्रूक व परिसरातील दहा ते बारा गावांमध्ये जोराचा वारा व विजांच्या कडकडाटात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पोटनिवडणुकीच्या धामधुमीत गुंतलेल्या प्रशासनाला शेतकऱ्यांचे नुकसान पाहण्यासाठी वेळ मिळेल का, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. 

सलगर बुद्रूक व परिसरातील आसबेवाडी, सलगर खुर्द, मारोळी, चिक्कलगी, जंगलगी, लवंगी, सलगर खुर्द, येळगी, शिवनगी, सोड्डी, बावची आदी गावांमध्ये रविवारी (ता. 11) सायंकाळी पाच ते रात्री नऊच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोराचा वारा व पाऊस सुरू झाला. यामुळे उन्हाळी बहार धरलेल्या डाळिंब बागांची फुले गळून गेली आहेत. आंब्याची झाडे उन्मळून पडली आहेत तर आंबे भुईसपाटही झाले आहेत. शेवगा व इतर तरकारी पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 

द्राक्षाच्या काढणीनंतर बेदाणा निर्मितीची प्रक्रिया जोरदार सुरू आहे. पण अशा वातावरणाचा परिणाम बेदाणा निर्मितीच्या प्रक्रियेवर होत आहे. सुमार दर्जाचा बेदाणा तयार होण्याची शक्‍यता जास्त असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. कोरोना महामारीमुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांची अवस्था आणखीनच वाईट झाली आहे. 

दरम्यान, प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने शेतकऱ्यांचा वाली कोण, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT