Upsc Result 2023
Upsc Result 2023  sakal
सोलापूर

UPSC Result 2023 : करमाळ्याच्या शुभांगीने घरीच केला अभ्यास अन् मिळवलं मोठं यश

आण्णा काळे

Upsc Result 2023 - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वंजारवाडी ता करमाळा येथील शुभांगी सुदर्शन केकान या केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. त्या 530 रँक ने ही परीक्षा पास झाल्या आहेत. शुभांगी केकान यांचे वडील सुदर्शन केकान हे प्राथमिक शिक्षक होते. मार्च 2023 मध्ये सुदर्शन केकान हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोंधवडी ता करमाळा येथून सेवानिवृत्त झाले आहेत.

शुभांगी केकान या विवाहित आहेत .त्यांचे सासर करमाळा तालुक्यातील शेलगाव (वा) हे आहे. त्यांचे पती ओंकार पोटे हे नगर येथे हे स्टेट बँकेत मॅनेजर कार्यरत आहेत .शुभांगी केकान यांचे शिक्षण बी.डी.एस झाले आहे. लग्नानंतर शुभांगी केकान यांनी स्पर्धा परीक्षा द्यायचा निर्णय घेतला त्यानंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनाही यश मिळाले आहे.

त्यांनी घरी राहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आहे त्यांना सहा वर्षाचा शिवम नावाचा मुलगा आहे त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.माझे पती ओंकार पोटे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून बँकेत अधिकारी झाले आहेत .लग्न झाल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलेला असल्यामुळे मला स्पर्धा परीक्षा करण्याचे प्रेरणा मिळाली त्यातून मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.

ही परीक्षा देत असताना मला माझे आई-वडील सासू-सासरे आणि पती यांनी मोलाची साथ दिली घरात लहान मुलगा असल्याने त्या मुलाकडे देखील मला लक्ष द्यावे लागत होते, मात्र जर आपल्या मनात जिद्द असेल तर आपण नक्कीच कुठलीही परीक्षा सहजपणे यशस्वी होऊ शकतो याचा आत्मविश्वास मला सुरुवातीपासूनच होता. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवले पाहिजे सुरुवातीच्या काळात अपयश आले म्हणून खचून न जाता जोमाने अभ्यास करत राहिल्यास यश मिळते .

शुभांगी केकान, करमाळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT