walse patil photo
walse patil photo 
सोलापूर

वळसे-पाटील म्हणाले...नको फेटा, द्या नोटा 

प्रमोद बोडके

सोलापूर : पालकमंत्री म्हणून आज पहिल्यांदा सोलापूरला आलो आहे म्हणून हार-तुरे, फेटे आणि फटाके ठीक आहे. या पुढे मला भेटायला काहीच आणू नका. मी कधीच फेटा बांधत नाही. फेटाच्या बदल्यात पैसे घेतो. आंबेगाव मतदार संघातील लोकांकडून मी फेट्याच्या बदल्यात पैसे घेतो. या पैशाची लगेच त्यांना पावती देतो. फेट्यातून मिळणारी रक्कम सरकारी रुग्णालयातील रुग्णांसाठी खर्च करतो. फेट्यातून आम्हाला वर्षाला आठ ते दहा लाख रुपये मिळत असल्याची माहिती सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज दिली. 
हेही वाचा - केंद्राने अडकविले राज्य सरकारचे तब्बल 46 हजार कोटी? 
सोलापूरच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर वळसे-पाटील यांचे आज सोलापुरात प्रथमच आगमन झाले. शहर व जिल्हा राष्ट्रवादीच्यावतीने शिवछत्रपती रंगभवन सभागृहात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. लोक प्रेमापोटी फेटे बांधतात आणि बांधलेल्या फेट्यांचे आपण काय करतो? हे सर्वांनाच माहिती आहे. एक फेटा किमान शंभर रुपयांना मिळतो. या पुढे मला भेटायला येताना काहीच आणू नका अन्यथा फेट्याचे पैसे रोख स्वरूपात द्या अशी सूचनाच पालकमंत्री वळसे-पाटील यांनी या मेळाव्यातून केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

Satara Lok Sabha : साताऱ्याचा खासदार कोण होणार? उमेदवारांचे भवितव्य होणार आज यंत्रात बंद

Met Gala 2024 : बावनकशी सौंदर्य ; मेट गालाला आलियाच्या लूकने वेधलं लक्ष... 'हे' आहे तिच्या खास साडीच वैशिष्ट्य

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी PM मोदी आज बीड दौऱ्यावर

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

SCROLL FOR NEXT