chain_theif 
सोलापूर

वेळापूर पोलिसांनी आवळल्या आंतरजिल्हा सोनसाखळी चोराच्या मुसक्‍या ! एक लाखाचा ऐवज जप्त

अशोक पवार

वेळापूर (सोलापूर) : वेळापूर पोलिसांनी पुणे, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांत सामील आंतरजिल्हा सोनसाखळी चोरास जेरबंद करून सुमारे एक लाखाचा ऐवज जप्त केल्याची माहिती वेळापूर पोलिसांनी दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी 13 मार्च 2020 रोजी सायंकाळी शंकर इंदर डिसले (रा. गिरवी, ता. इंदापूर, जि. पुणे) हे पत्नीसह मोटारसायकलवरून वेळापूर मार्गे जात असताना येथील सिद्धी गार्डनजवळ पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्याने चालत्या मोटरसायकल वरूनच त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे 35 ग्रॅम वजनाचे गंठण व 3 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हे दागिने हिसकावून पसार झाला. त्याबाबत शंकर डिसले यांच्या तक्रारीवरून वेळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 

पोलिस हेडकॉन्स्टेबल अनिल बनसोडे तपास करीत असताना, चोरट्याने वापरलेली बजाज डोमिनार मोटारसायकल शिरवळ येथे बनावट नंबर टाकून वेळापूर येथे सोनसाखळी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, नाशिक पोलिसांनी राजाभाऊ ऊर्फ राजू खेमू राठोड (वय 36, रा. एकंबी तांडा, ता. औसा, जि. लातूर) या सराईत सोनसाखळी चोरास पकडून त्याच्या ताब्यातील बजाज डोमिनार मोटारसायकल जप्त केल्याची माहिती पोलिस हेडकॉन्स्टेबल अनिल बनसोडे यांना मिळाली. या चोरट्यास न्यायालयाच्या आदेशाने वर्ग करून घेऊन तपास केला असता त्या चोरट्याने वेळापूर येथे सोनसाखळी चोरी केल्याची कबुली देऊन चोरलेले दागिने हे वडगाव शेरी (पुणे) येथे सराफास विकले असल्याचे सांगितले. 99 हजार 500 रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले. आरोपीने नाशिक, शिरवळ व पुणे परिसरात अशाच प्रकारच्या चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात पुढे आले आहे. 

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल श्री. बनसोडे, दिलीप जाधव, विलास नलवडे, जनार्दन करे, अमोल वाघमोडे, महेश पोरे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

Smoking करायला बंदी असताना सुद्धा विमानात ashtrays का असतात? जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण

SEBI म्युच्युअल फंड आणि डीमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार! सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा 'हे' महत्त्वाचे काम

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णयाने जीवदान मिळालेला वॉशिंग्टन नडला; गुजरातला सावरले, बंगळुरूसमोर ठिकठाक लक्ष्य

SCROLL FOR NEXT