Light_Bill 
सोलापूर

वेळापूर उपविभागाने केली विक्रमी 11.50 कोटी रुपयांची वीजबिल वसुली !

अशोक पवार

वेळापूर (सोलापूर) : वेळापूर (ता. माळशिरस) येथील महावितरण उपविभागामध्ये शेती पंपाची 9 कोटी 50 लाख रुपये तर घरगुती 2 कोटी रुपयांची अशी सुमारे 11 कोटी 50 लाख रुपयांची विक्रमी वीजबिले वसूल झाल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब मोटे यांनी दिली. 

वेळापूर उपविभागातील 44 गावांतून शेती पंपाची वीजबिले वसुली करण्यासाठी वीज पुरवठा खंडित केला होता. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर संघर्षाचे वातावरण निर्माण झाले होते. वेळापूर परिसरातील विविध राजकीय व सामाजिक संघटना, शेतकरी संघटनांच्या समन्वयाने महावितरणचे सर्व कर्मचारी या सर्वांनी एकत्र येऊन बैठक घेऊन चर्चेतून तोडगा काढला. यामुळे कुठलाही संघर्ष, वाद, अनुचित घटना न घडता महावितरणचे वीजबिल वसुलीचे चांगले काम वेळापूर उपविभागात झाले. याचे श्रेय उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब मोटे यांनी विविध राजकीय, सामाजिक व शेतकरी संघटना, शेतकरी वर्ग व महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दिले. 

माळशिरस तालुक्‍यातील एकूण चार विभागांत वेळापूर महावितरण वसुलीमध्ये अव्वल स्थानी आहे. विक्रमी प्रतिसाद मिळाल्याबद्दल महावितरणच्या वतीने भाजपचे तालुका उपाध्यक्ष अमरसिंह माने - देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश माने - देशमुख, ओंकार देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर माने - देशमुख यांच्यासह आदींचा सत्कार करण्यात आला. 

शेती पंपासाठी सलग आठ तास पुरेशा दाबाने वीज पुरवण्यासाठी आवश्‍यक तेथे दुरुस्तीसह येत्या काळात तांदूळवाडी येथे वीज वितरण उपकेंद्र कार्यान्वित होत आहे. शेतकऱ्यांचे महावितरणला यापुढेही असेच सहकार्य मिळावे. 
- भाऊसाहेब मोटे, 
उपकार्यकारी अभियंता, वेळापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

मग काय करणार? गणपती विसर्जनावेळी चक्क साडी नेसून नदीत पोहली मराठमोळी गायिका; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Ajintha ST Accident: अजिंठ्यात एसटी बसचा थरारक अपघात; ट्रेलरला मागून धडक, २० हून अधिक प्रवासी जखमी

Latest Marathi News Live Update : टीएमसीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद तीन महिन्यात निकाली काढण्याचे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT