Village meetings of Madha police are underway on the backdrop of Gram Panchayat elections.jpg 
सोलापूर

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा पोलिसांच्या गावोगावी बैठका

अक्षय गुंड

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : नुकत्याच सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे गावोगावी राजकिय चर्चांनी जोर धरला आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने ह्या निवडणुका शांततामय वातावरणात पार पाडाव्यात, यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. माढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमुल कादबाने यांनी पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या गावोगावी बैठका घेऊन निवडणूका बिनविरोध करा, असे आव्हान करत असून, नागरिकातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
‌‌‌‌‌‌‌‌‌ 
हे ही वाचा : नियमांचे पालन करु, सिद्धरामेश्‍वर महाराजांच्या यात्रेला परवानगी द्या 

माढा पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्याअनुषंगाने गावोगावी नेतेमंडळींची चाचपणी सुरू आहे. परंतु माढा पोलिस ठाण्याच्या वतीने या निवडणुका बिनविरोध कराव्यात असे आव्हान करण्यात येत असून, त्याअनुषंगाने बैठक घेऊन आव्हान केले जात आहे. नागरिकांचा देखील या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे. आतापर्यंत तांदुळवाडी, धानोरे, कापसेवाडी या गावात बैठका घेण्यात आल्या आहेत. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमूल कादबाने यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे, पोलिस कॉन्स्टेबल पांडुरंग देशमुख, बालाजी घोरपडे आदी उपस्थित होते. 

ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध व्हावेत, या हेतूने आम्ही स्थानिक नेते मंडळी व नागरिकांना बैठका घेऊन त्या माध्यमातून आवाहन करत आहोत. बरेच गावांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. माढा पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या सर्वच गावांमध्ये बैठका घेऊन नागरिकांना याबाबत आव्हान करणार आहोत. 
- अमूल कादबाने, सहाय्यक पोलिस निरीक्षक- माढा.


संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs MI Live: मुंबई इंडियन्स - राजस्थान रॉयल्स सामना केव्हा सुरू होणार? षटकं कमी होत चालली, मॅच ५-५ ओव्हर्सची होणार? Cut-off time जाहीर

Mumbai News : कुलगुरूंच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डीबाटू विद्यापीठाचे २०२५ मधील हिवाळी परीक्षांचे निकाल जाहीर

Gadchiroli Accident : अपघातात दांपत्याचा मृत्यू; सहा वर्षांची चिमुकली झाली पोरकी

Donald Trump: ''आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल'', डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

मोठी बातमी! राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा, आज पुन्हा ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली

SCROLL FOR NEXT