grampanchayt.jpg 
सोलापूर

वडाळा व वांगी ग्रामपंचायत सरपंचाची निवड होणार गुरुवारी

संतोष सिरसट

उ. सोलापूर (सोलापूर) : उत्तर सोलापूर तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. आता त्या गावातील सरपंच निवडीचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यानुसार 22 ग्रामपंचायतीचा सरपंचांची निवड मंगळवारी (ता. 9) तर दोन गावच्या सरपंच निवड गुरुवारी(ता.11) होणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. 

उत्तर सोलापूर तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींपैकी पडसाळी व पाथरी या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 22 ग्रामपंचायतींमध्ये मतदान होऊन लोकांनी अनेक ठिकाणी परिवर्तन केले आहे. सरपंच निवडीचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता होती. त्यानुसार प्रशासनाने तालुक्यातील सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी अध्यासी अधिकाऱ्यांच्या नेमणुका ही प्रशासनाने केल्या आहेत. 

मंगळवारी सरपंच निवडी होणारी गावे
बाणेगाव, बेलाटी, भागाईवाडी, भोगाव, बीबीदारफळ, एकरूख तरटगाव, गुळवंची, हगलुर, तळे हिप्परगा, हिरज, होनसळ, कळमण, खेड, कोंडी, नान्नज, पडसाळी, पाथरी, राळेरास, साखरेवाडी, सेवालाल नगर, तेलगाव, तिरे. 

गुरुवारी सरपंच निवडी होणारी गावे
वडाळा,  वांगी.

अनेक गावांमध्ये होणार चुरस
उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये सरपंच निवडीच्या वेळेस चुरस दिसून येणार आहे. काही ठिकाणी अत्यंत चुरशीने मतदान होऊन ग्रामस्थांनी एखाद्या दुसऱ्या जागेचा फरक सत्ता मिळवण्यासाठी ठेवला आहे. त्यामुळे सरपंच कोणत्या गटाचा होणार आहे हे ठामपणे सांगणे अवघड आहे. तालुक्यात सगळ्यात मोठ्या असलेल्या नान्नज ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी भाजप युती ला दहा तर शिवसेनेला सात जागा मिळाल्या आहेत. त्या ठिकाणी सर्वसाधारण महिला सरपंच पदाचे आरक्षण पडले आहे. त्यामुळे त्या गावचा सरपंच कोण होणार याबाबत तालुक्यात उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : गेम फिरणार? शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; अचानक एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात

Shiv Sena Case: सुप्रीम कोर्टानेही मानलं शिवसेना ठाकरेंची? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादातून नेमकं काय समोर आलं? ते 11 मुद्दे काय?

Real Estate Revenue: बांधकाम क्षेत्राला अच्छे दिन! चार महिन्यांत मुद्रांक विभागाचा महसूल २१,९२८ कोटींवर; १७ टक्क्यांनी वाढ

Koyna Dam Water Level : कोयना धरणातील पाणीसाठा चार दिवसांपासून 92 टीएमसीवर स्थिर; महाबळेश्वर, नवजा, कोयनानगरमध्ये किती पाऊस?

Marathi News Live Updates : पुण्यासह पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सातारा, कोल्हापूर, कोकणासाठी आज यलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT