02Child_Mask_0 - Copy.jpg 
सोलापूर

कोरोनामुक्‍तीसाठी प्रभागाची धडपड ! आता 728 पैकी 32 रुग्णांवर सुरु आहेत उपचार

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील रुग्णसंख्येने दहा हजारांचा टप्पा ओलांडल्यानंतर हद्दवाढ भाग आता कोरोनामुक्‍तीसाठी धडपडतोय. नगरसेविका प्रिया माने, राजश्री चव्हाण, नगरसेवक शिवा बाटलीवाला यांनी परिश्रम घेत नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून मदत केली. तर जनजागृतीबरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजीही घेतली. त्यामुळे आता या प्रभागात केवळ 32 रुग्ण राहिले आहेत.

प्रभागाविषयी ठळक बाबी...

  • एकूण कोरोना पॉझिटिव्ह 729
  • एकूण रुग्णांपैकी 674 रुग्णांची कोरोनावर मात
  • प्रभागातील 23 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू
  • सद्यस्थितीत प्रभागात उरले 32 ऍक्‍टिव्ह रुग्ण

हद्दवाढ भाग असलेल्या प्रभाग 26 ची लोकसंख्या सुमारे 32 हजारांपर्यंत आहे. या प्रभागामध्ये आतापर्यंत 729 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. कल्याण नगर, कुमठे गाव, कुमठा तांडा, सोरेगाव (अमर नगर), रेणुका नगर, सैफूल, एसआरपी कॅम्प, वैष्णवी नगर, रोहिणी नगर, प्रल्हाद नगर, प्रियंका नगर, राऊत वस्ती अशा ठिकाणी सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले. मात्र, लॉकडाउन काळात जनजागृतीवर भर देत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. दोन्ही महिला नगरसेवकांनी त्यांच्या कुटुंबियांना मदतीला घेत प्रभागातील नगरांमधील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. सामाजिक संघटनांसह कोरोना वॉरिअर्सचेही त्यांना मोठे सहकार्य लाभले. आता हा प्रभाग डेंजर झोनमधून बाहेर आला असून प्रभागातील बहुतांश नगरे कोरोनामुक्‍त झाली असून काही नगरे कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर आहेत. नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन केल्यास कोरोनाची दुसरी लाट निश्‍चितपणे थोपविता येईल, असा विश्‍वास नगरसेवकांनी व्यक्‍त केला आहे.


संशयितांवर वेळेत केले उपचार
कुमठे गाव, कुमठे तांडा यासह अन्य नगरांमधील कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा, घरातील कोणीही कोरोनाचा बळी ठरणार नाही, यादृष्टीने नियोजनबध्द काम केले. लॉकडाउन काळात गरजूंना धान्य वाटप, मास्क, सॅनिटायझर वाटप करीत अनेक भागांमध्ये फवारणी केली. संशयितांवर तत्काळ उपचार व्हावेत म्हणून खासगी वाहनांची व्यवस्था केली. जैन संघटनेच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे, रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट घेतली. आता संसर्ग कमी होऊ लागला असून नागरिकांचे सहकार्य मिळत आहे.
- प्रिया माने, नगरसेविका


कोरोना वाढणार नाही याची दक्षता सुरवातीपासूनच घेतली
प्रभागातील कोरोना वाढणार नाही याची दक्षता सुरवातीपासूनच घेतली. मास्क, सॅनिटायझरसह गरजूंना जिवनावश्‍यक वस्तूंचे वाटप केले. महापालिकेच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे, रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट घेतल्या. 30 हजारांहून लोकसंख्या असलेल्या प्रभागातील नागरिकांनी नियमांचे पालन केल्याने आता कोरोना आटोक्‍यात येऊ लागला आहे.
- राजश्री चव्हाण, नगरसेविका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोहम्मद सिराजला मिळाला ICC चा मोठा पुरस्कार; म्हणाला, 'हा सन्मान फक्त माझा नाही, तर...'

महात्मा गांधींच्या पुतळ्याला भाजपची टोपी, हातात पक्षाचा झेंडा; NDAच्या शिबिरात नेत्यांचा प्रताप, काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Politics : ३२ टक्के राजकारणी घराणेशाहीचे प्रतिक; ‘एडीआर’च्या अहवालातील महाराष्ट्राची स्थिती

Junnar News: 'ड्रंक अँड ड्राईव्ह आरोपींना आर्थिक दंडाबरोबर दोन वृक्ष लावण्याचा आदेश'; लोकन्यायालयातील पर्यावरणपूरक निर्णयाचे होतेय कौतुक

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

SCROLL FOR NEXT