2warer_20suply_0.jpg 
सोलापूर

शहर व हद्दवाढ भागात उद्या (शनिवारी) कमी वेळ, कमी दाबाने येणार पाणी

तात्या लांडगे

सोलापूर : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकळी हेड वर्क्‍स मेन पाईपलाईनला मंगळवारी (ता. 20) दुपारी दोनच्या सुमारास गळती लागली होती. दुरुस्तीसाठी तब्बल 18 तासांचा वेळ लागला, तर शुक्रवारी (ता. 23) पहाटे तीन वाजता अक्कलकोट विभागातील विद्युत पुरवठा करणारा ट्रान्स्फॉर्मर बस्ट झाल्याने टाकळीचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा उद्या (ता. 24) कमी दाबाने, कमी वेळ, उशिराने होईल, असे सार्वजनिक आरोग्य अभियंत्यांनी पत्राद्वारे कळविले आहे.


ठळक बाबी...

  • पाईपलाईन गळती, विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने टाकळीतून पाण्याचा उपसा पुरेसा झालाच नाही
  • अक्‍कलकोट विभागातून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास लागला साडेअकरा तासाचा अवधी
  • सोरेगाव जलशुध्दीकरण केंद्रावरून होणारा पाणी पुरवठा विस्कळीत
  • शहर व हद्दवाढ भागातील पाणी पुरवठा उशीरा, कमी वेळ, कमी दाबाने होईल


पाईपलाईन फुटल्याने आणि विद्युत पुरवठा तब्बल साडेअकरा तास खंडीत झाल्याने टाकळी हेड वर्क्‍स योजनेतून पुरेशा प्रमाणात पाणी उपसा होऊ शकला नाही. त्यामुळे सोरेगाव जलशुध्दीकरण केंद्रावरून होणारा पाणी पुरवठा शनिवारी (ता. 24) नियोजित वेळेत होणार नाही. परतीच्या पावसाने उजनीसह हिप्परगा, औज बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. सणासुदीत नागरिकांना पुरेशा प्रमाणात एक तथा दोन दिवसाआड पाणी मिळेल, अशी आशा होती. त्यासंदर्भात आमदार विजयकुमार देशमुख यांनी आयुक्‍त पी. शिवशंकर, महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासमवेत बैठक घेतली होती. मात्र, विविध कारणांमुळे पाणी पुरवठा 'जैसे थे'च आहे. सणासुदीत नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठीही पदरमोड करावी लागत आहे. उद्या (शनिवारी) शहर व हद्दवाढ भागातील पाणी पुरवठा उशीरा, कमी वेळ, कमी दाबाने होणार आहे. या कालावधीत संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा एकवेळ एक रोटेशन चार दिवसाआड राहील, असेही सार्वजनिक आरोग्य अभियंत्यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT