शिवसेना, राष्ट्रवादी युती sakal
सोलापूर

राऊतांच्या मनातील ते साडेतीन नेते कोण? सोलापुरातील शिवसेना नेत्याने दिले उत्तर

भाजपचा मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्र्यांनी अनेक घोटाळे केले आहेत. त्यांचे घोटाळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बाहेर काढावे, असे आवाहन शिवसेनेचे उपशहराध्यक्ष प्रताप चव्हाण यांनी केले.

तात्या लांडगे

सोलापूर : भाजप नेते किरीट सोमय्यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांना टार्गेट करून त्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचे काम हाती घेतले आहे. पुण्यातील प्रकारानंतर ते जास्तच आक्रमक झाले असून त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. या पार्श्‍वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करण्याचा इशारा दिला. त्याचवेळी सोलापुरातील शिवसेनचे उपशहराध्यक्ष प्रताप चव्हाण, विजय पुकाळे यांनी एक पोस्टर तयार करून भाजप व सोमय्यांचा निषेध केला. त्या पोस्टरमध्ये संजय राऊत यांच्या पायाखाली किरीट सोमय्यांना दाखविण्यात आले आहे.

भाजपचा मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्र्यांनी अनेक घोटाळे केले आहेत. त्यांचे घोटाळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बाहेर काढावे, असे आवाहन शिवसेनेचे उपशहराध्यक्ष प्रताप चव्हाण यांनी केले. दरम्यान, भाजपला डावलून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजप अस्वस्थ झाला आहे. त्यांचे नेते चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या व आशिष शेलार हे साडेतीन नेते दररोज काही ना काही आरोप करीत फिरत आहेत. त्यांचे आरोप खपवून घेतले जाणार नसून संपूर्ण शिवसैनिक मुख्यमंत्र्यासह आदित्य ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचेही प्रताप चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.

उपशहराध्यक्ष प्रताप चव्हाण म्हणाले...
- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे काम कौतुकास्पद; महाविकास आघाडी सरकार आल्याने भाजप अस्वस्थ
- भाजपच्या मंत्र्यांनी अनेक मोठमोठे घोटाळे केले; देवेंद्र फडणवीसांनी जलयुक्‍त शिवारमध्ये मोठा भ्रष्टाचार केला
- किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार हे भाजपमधील साडेतीन नेते
- किरीट सोमय्या यांचे आरोप खपवून घेतले जाणार नाहीत; सोलापुरात आल्यानंतर कपडे फाडून हाकलून देऊ
- महाविकास आघाडी सरकारने भाजप नेत्यांचे घोटाळे बाहेर काढून त्यांना तुरूंगात पाठवावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT