MNS Dilip Dhotre 
सोलापूर

MNS Dilip Dhotre: मनसेच्या स्थापनेपासून सोबत... राज ठाकरेंचे कट्टर समर्थक दिलीप धोत्रे कोण? पंढरपुरमधून मिळालीये उमेदवारी

Who is Dilip Dhotre MNS candidate Pandharpur: राज ठाकरे यांनी शिवडीमधून बाळा नांदगावकर यांच्या नावाची घोषणा केलीये, तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांचे नाव जाहीर केले आहेत. यासंदर्भात दिलीप धोत्रे हे नेमकं कोण आहेत हे आपण जाणून घेऊया.

कार्तिक पुजारी

सोलापूर- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी दोन उमेदवारांची घोषणा करून आघाडी देखील घेतली आहे. राज ठाकरे यांनी शिवडीमधून बाळा नांदगावकर यांच्या नावाची घोषणा केलीये, तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांचे नाव जाहीर केले आहेत. यासंदर्भात दिलीप धोत्रे हे नेमकं कोण आहेत हे आपण जाणून घेऊया.

कोण आहेत दिलीप धोत्रे?

दिलीप धोत्रे हे गेल्या 33 वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत. राज ठाकरे शिवसेनेत होते तेव्हाही दिलीप धोत्रे हे राज ठाकरे समर्थक म्हणून ओळखले जायचे. 1991 पासून भारतीय विद्यार्थी सेना, कॉलेज शाखाप्रमुख, गटप्रमुख, उप तालुकाध्यक्ष , तालुका अध्यक्ष, उपशहर अध्यक्ष, शहराध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी शिवसेनेमध्ये असताना भूषवली.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर त्यांच्यासोबत दिलीप धोत्रे आले. दिलीप धोत्रे यांनी सोलापूर जिल्ह्यात मोठे योगदान दिलं आहे. अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. शिबिरांपासून लोकोपयुक्त अशी अनेक कामे त्यांनी केली आहेत.

मनसेचे सध्या ते प्रमुख नेते आहेत. याआधी मनसेचे उपनेते त्याचप्रमाणे शहर अध्यक्ष पदही त्यांनी भूषवलं आहे. 2009 ला विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट देण्यात आलं होतं मात्र ते कमी मतांनी निवडणूक हरले होते. आता पुन्हा त्यांना विधानसभेचं तिकीट मनसेतर्फे देण्यात आला आहे. त्यांच्यावर मनसेने विश्वास टाकला आहे. त्यामुळे विधानसभेला ते कमाल करतात का? हे पाहावं लागेल.

लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्येही ते महायुतीसोबत असणार का, अशी चर्चा सुरु होती. पण, त्यांनी दिलेला पाठिंबा फक्त लोकसभेपुरता मर्यादीत होता असं स्पष्ट केलं आहे. आता, विधानसभेला २०० ते २५० उमेदवार उभे करण्याची तयारी राज ठाकरे यांनी सुरु केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय

MI vs RR: आधी आऊट, मग नो बॉल अन् चौकार... जडेजाने शार्दुल ठाकूरची भर मैदानात उडवली खिल्ली! Video होतोय Viral

Sangli Advocate Death : 'माझ्या मृत्यूला कोणालाही...'; मरण्यापूर्वी 27 वर्षीय वकिलाने चिठ्ठीत काय लिहिलं? सांगलीतील घटनेने खळबळ

आश्रम ३ मधील इंटीमेट सीनवर पहिल्यांदाच बोलला बॉबी देओल, म्हणाला, 'मी फार घाबरलो होतो'

विधानपरिषदेआधी काँग्रेसला धक्का? ७० नगरसेवक नॉट रिचेबल; राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT