election esakal
सोलापूर

सोलापूर बार असोसिएशनचा नवा अध्यक्ष कोण? ॲड. गायकवाडविरूध्द ॲड. फताटे यांच्यात लढत

सोलापूर वकिलांच्या बार असोसिएशनसाठी ११ नोव्हेंबर रोजी मतदान आहे. तत्पूर्वी, अध्यक्षपदासाठी ॲड. सुरेश गायकवाड व ॲड. राजेंद्र फताटे या दोघांच्या विधीसेवा व विधी विकास पॅनलमध्येच थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : येथील वकिलांच्या बार असोसिएशनसाठी ११ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते सांयकाळी पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. तत्पूर्वी, अध्यक्षपदासाठी ॲड. सुरेश गायकवाड व ॲड. राजेंद्र फताटे या दोघांच्या विधीसेवा व विधी विकास पॅनलमध्येच थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘विधी विकास’ पॅनलमधून अध्यक्षपदासाठी पॅनलप्रमुख स्वत: ॲड राजेंद्र फताटे, उपाध्यक्षासाठी ॲड. आसिम बांगी, सचिवपदासाठी ॲड. करण भोसले, खजिनदार पदासाठी ॲड. अविनाश काळे आणि सहसचिव पदासाठी ॲड. शाहीन शेख हे उमदेवार मैदानात उतरले आहेत. या पॅनलने नवोदित वकिलांना मानधन मिळवून देऊ, प्रशस्त सभागृह, अद्ययावत लायब्ररी, वकिलांच्या संरक्षणासाठी संरक्षण समिती, वकिलांना न्यायाधीश होण्याची संधी मिळावी म्हणून मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्याची ग्वाही जाहीरनाम्यातून दिली आहे. तर ‘विधीसेवा पॅनल’कडून अध्यक्षपदासाठी पॅनलप्रमुख ॲड. सुरेश गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उपाध्यक्षासाठी ॲड. सिध्दाराम म्हेत्रे, सचिव पदासाठी ॲड. अभिजित देशमुख, सहसचिव पदासाठी अनिता रणशृंगारे व खजिनदार पदासाठी ॲड. अब्दुल शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ॲड. गायकवाड यांच्या विधीसेवा पॅनलने देखील नवोदित वकिलांचाच मुद्दा जाहीरनाम्यात अधोरेखित करीत त्यांचे प्रश्न प्रामुख्याने सोडविण्याची ग्वाही दिली आहे.

बार असोसिएशनचे उमेदवार

  • अध्यक्ष : ॲड. सुरेश गायकवाड व ॲड. राजेंद्र फताटे.

  • उपाध्यक्ष : ॲड. सिद्धाराम म्हेत्रे, ॲड. आसिम बांगी.

  • सचिव : ॲड. अभिजित देशमुख, ॲड. करण भोसले, ॲड. लक्ष्मण पाटील.

  • सहसचिव : ॲड. अनिता रणशृंगारे, ॲड. शाहिन शेख, ॲड. सुवर्णा शिंदे.

  • खजिनदार : ॲड. अब्दुल शेख, ॲड. अविनाश काळे, ॲड. संतोषकुमार बाराचारे, ॲड. विनयकुमार कटारे व ॲड. एच. अगनुर.

सचिव-सहसचिव अन्‌ खजिनदारासाठी अधिक उमेदवार

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीसाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची थेट निवडणूक होईल हे स्पष्ट झाले आहे. पण, सचिव, सहसचिव पदासाठी प्रत्येकी एक तर खजिनदार पदासाठी तिघांनी स्वतंत्रपणे अर्ज दाखल केले आहेत. अर्जावर आज (शनिवारी) हरकती नोंदवता येणार आहेत. ८ नोव्हेंबर रोजी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत असून त्यावेळी सर्व लढतींचे चित्र स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ए. आर. रहमान यांच्या मुलाचा अपघात; पहाटे 3 वाजता Porsche ची धडक

Marathi News Live Updates : JPSC-JSSC परीक्षार्थींच्या आंदोलनाला आक्रमक वळण; लाठीचार्जनंतर विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या दिशेने भिरकावल्या चपला, बाटल्या

Blocked Nose: सर्दी नाही तरी रात्रीच्या वेळी नाक का बंद होते? जाणून घ्या कारण आणि सोपे उपाय!

Mumbai Train Disturb: मुलुंड स्टेशनमध्ये ट्रेनवर काहीतरी पडले; आग लागली.. धुरांचे लोट अन् मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत Video

Bhudargad Fort Wall Collapse : अवघ्या 2 वर्षांत ऐतिहासिक भुदरगड किल्ल्याची 50 फूट लांबीची तटबंदी कोसळली; कोट्यवधींचा निधी पाण्यात, गडप्रेमींचा तीव्र संताप

SCROLL FOR NEXT