Woman gives delivery on the road in Pandharpur 
सोलापूर

पहाटे अडीच वाजता प्रसूती कळा सुरु झाल्या, तीने बाळाला जन्म दिला अन्‌ सरंक्षण केले कुत्र्याने

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनच्या काळात पहाटे अडीच वाजता प्रसूती वेदनेमुळे रस्त्याकडेला तळमळणार्‍या एका महिलेचे घरातील पाळीव कुत्रा राजाने संरक्षण केले. कोरोनाच्या साथीत मुक्या राजाने आपल्या गरीब घर मालकिणीला दिलेली साथ अचंबित करणारी आहे.
येथील संत पेठेतील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकाच्या जवळ खंडू गायकवाड हे गरीब वीटभट्टी मजूर राहतात. त्यांची पत्नी गौरी हिला पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास प्रसुती कळा सुरू झाल्या. गौरी आणि तिचा पती खंडू हे दवाखान्यात जाण्यासाठी घराबाहेर आले. त्यांच्यासोबत होता त्यांच्या घरातील राजा कुत्रा. संचारबंदी असल्यामुळे दिवसादेखील वाहने उपलब्ध होत नाहीत, अशा काळात पहाटे अडीच वाजता तरी वाहन कोठून मिळणार. खंडूने रस्त्याकडेला गौरीला बसवून जवळच असलेले नगरसेवक कृष्णा वाघमारे यांच्या घराकडे धाव घेतली. त्याचवेळी गौरीला प्रसूती कळा वाढल्या आणि तिने रस्त्याकडेलाच एका गोंडस बालिकेला जन्म दिला. खंडू आणि नगरसेवक कृष्णा वाघमारे परत तिथे येईपर्यंत राजा कुत्रा आपली गरीब मालकीण आणि तिच्या नवजात बालिकेचे रक्षण करण्यासाठी उभा होता. खंडू आणि नगरसेवक कृष्णा वाघमारे त्या ठिकाणी पोहोचले. खंडूच्या कुटुंबीयांनी गौरीला घरी नेले. कृष्णा वाघमारे यांनी या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने 15 दिवस पुरेल एवढा किराणामाल त्यांच्या घरी पोहोच केला आणि समाजाच्या मदतीने नवजात बालकेसाठी लागणारी वैद्यकीय मदत करू असा धीर या कुटुंबाला दिला.
कोरोनामुळे सध्या बहुतांश भागात संचारबंदी आहे. त्यामुळे रिक्षा अथवा अन्य वाहने उपलब्ध होऊ शकत नाहीत. अशावेळी तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी नागरिकांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधून मदत मागितली पाहिजे. यासंदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानूरकर यांना विचारले असता ते म्हणाले प्रत्येक प्रभागांमध्ये तातडीच्या मदतीसाठी दोन रिक्षा चालकांची नियुक्ती केलेली आहे. नगरसेवकांकडे संबंधित रिक्षाचालकांची नावे आणि क्रमांक दिलेले आहेत. नागरिकांच्या माहितीसाठी रिक्षाचालकांची नावे आणि त्यांचे संपर्क क्रमांक उद्या प्रसिद्धीस देणार आहोत. तातडीच्या मदतीसाठी लोकांनी या रिक्षांचा वापर करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT