womans daya logo.jpg 
सोलापूर

महिलांनी चांगले ध्येय ठेवून प्रगतीसाठी कार्य करावे : उर्मिलादेवी गायकवाड यांचे मत

संतोष सिरसट

उ. सोलापूर (सोलापूर) : महिलांनी चांगले ध्येय ठेवून प्रगती साधण्यासाठी कार्य करावे असे प्रतिपादन शबरी कृषि प्रतिष्ठानच्या संस्थापिका उर्मिलादेवी गायकवाड यांनी केले. 
त्या शबरी कृषि प्रतिष्ठान सोलापूर, संचलित कृषि विज्ञान केंद्र सोलापूर तर्फे आयोजित जागतिक महिला दिन या कार्यक्रमात म्हणुन बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे म्हणूान उपस्थित होते. प्रमुख पाहूण्या म्हणूान त्वचारोग तज्ञ डॉ. स्मिता चाकोते, जलकन्या भक्ती जाधव उपस्थित होत्या. यावेळी कृषि विज्ञान केद्र, सोलापूरचे विशेषज्ञ प्रदिपकुमार गोंजारी, अनिता सराटे, उद्योजिका वनिता तंबाखे उपस्थित होते. 
कृषि विज्ञान केंद्राच्या चर्चासत्राचे प्रास्ताविक विषय विशेषज्ञ अनिता सराटे यांनी केली. 
अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. लालासाहेब रा. तांबडे यांनी शेतकरी महिलांनी ज्वारी प्रक्रिया, मुल्यवर्धीत गांडूळखत उत्पादन, बिजोत्पादन, अर्धबंधीस्त शेळी पालन विषयावर शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सक्षम आहे असे सांगितले. 
डॉ. स्मिता चाकोते यांनी स्त्रीयांनी शारिरीक सौदर्याबरोबरच मानसिक सौंदर्य ही जपले पाहिजे. जलकन्या भक्ती जाधव यांनी जलसंवर्धनाच्या कार्यात शेतकरी महिलांचा अधिक कार्यक्षम सहभाग गरजेचा असल्याचे व्यक्त केले. 
यावेळी कोरोना काळात थेट भाजीपाला विक्री करणा-या भाग्यश्री लोंढे, उत्कृष्ठ सेद्रिय परसबाग करणा-या विजया सुरवसे, कृषि प्रकिया उद्योजिका सुनिता खांडेकर, ज्वारी प्रक्रिया उद्योजिका विजया बोराडे, सेंद्रिय शेती करणा-या साधना बामणे यांचा सत्कार झाला. यावेळी झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत भाग्यश्री लोंढे प्रथम, अपर्णा देशमुख द्बितीय तर सुनिता खांडेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. उद्योजिका वनिता तंबाखे यांचे श्रीदर्शनी या फिरत्या विक्री केंद्राचे उद्घाटन झाले. सुत्रसंचालन प्रदिपकुमार गोंजारी यांनी केले. तर आभार विकास भिसे यांनी केले. तर हा कार्यक्रमासाठी यशस्वी करण्यासाठी सतिश कवाडे, ज्योती ढेकणे-गावडे, शिवाजी माने, गोंविद पाटील, गणेश कांबळे यांनी प्रयत्न केले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: ''आमचे 'हे' त्यातले नाहीत!'', अशोक खरातच्या पत्नीने केली नवऱ्याची पोलखोल

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

'साहेब! लग्नाला ६० वर्ष झालीत, तरीही माझे हे...'; ८८ वर्षीय पतीविरोधात ८५ वर्षीय महिलेची भलतीच तक्रार, काय घडलं?

Share Market: शेअर मार्केट Crash मध्येही हे 10 शेअर्स ठरले धुरंधर! आठवड्यात 40% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

'ठरलं तर मग'च्या सुमन काकूंना खऱ्या आयुष्यात आहे 'हा' गंभीर आजार; म्हणाल्या- दिग्दर्शकाने हाक मारली तरी...

SCROLL FOR NEXT