Loco Shed
Loco Shed Canva
सोलापूर

शंभर कोटी खर्चून दौंड लोको शेडचे काम सुरू ! दोनशे इलेक्‍ट्रिक इंजिन दुरुस्तीची असणार क्षमता

विजय थोरात

सोलापूर : रेल्वेच्या विद्युत इंजिनची अत्याधुनिक पद्धतीने देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी दौंड (जि. पुणे) येथे लोको शेड (Loco Shed) उभारण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. भारतीय रेल्वे कन्स्ट्रक्‍शन कंपनीकडून (Indian Railway Construction Company) गेल्या काही महिन्यांपासून याचे काम देखील सुरू करण्यात आले. तब्बल 100 कोटी रुपये खर्चून दौंड रेल्वे स्थानकाजवळील सुमारे दहा ते बारा हेक्‍टर जागेत हे काम सुरू करण्यात आले आहे. जवळपास 200 इलेक्‍ट्रिक इंजिन दुरुस्तीची क्षमता या लोको शेडची असणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी दिली. (Work on Daund Electric Engine Repair Loco Shed is in progress)

मध्य रेल्वे सोलापूर विभागातील पहिला तर देशातील 24 व्या क्रमांकाचा दौंड लोको शेड असणार आहे. रेल्वेने यापूर्वी देशात तीन लोको शेड उभारले आहेत. रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम देशात वेगाने सुरू आहे. सध्या पुणे ते गुंटकल व्हाया सोलापूर, दौंड- बारामती, दौंड- मनमाड, पुणे- मिरज- कोल्हापूर आदी मार्गांवर हे काम सुरू आहे. तर काही ठिकाणी लवकरच सुरू केले जाणार आहे. काम पूर्ण झाल्यावर विद्युत इंजिनची संख्या भविष्यात वाढणार आहे. विजेवर धावणाऱ्या या इंजिनच्या दुरुस्तीसाठी सोयीस्कर जागा मिळावी म्हणून मध्य रेल्वेने दौंड येथे लोको शेडची निवड केली आहे. या ठिकाणी सुमारे एक ते दीड वर्षात शेड उभारणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

असे असणार इंजिन दुरुस्तीचे वेळापत्रक

प्राथमिक स्वरूपात तीन टप्प्यांवर इंजिन दुरुस्ती होते. शेडमधून इंजिन बाहेर पडल्यानंतर 90 दिवसांनी पहिला टप्पा, 180 दिवसांनंतर दुसरा तर 270 दिवसांनंतर तिसऱ्यांदा इंजिनची दुरुस्ती केली जाते. तसेच 45 दिवसांनंतर ट्रीप इन्स्पेक्‍शन होते. इंटरमिडिएट हॉलिंग प्रकारात साडेपाच ते साडेसहा वर्षे झालेल्या किंवा 12 लाख किमी धावलेल्या इंजिनची दुरुस्ती केली जाते. तर पीओएच पिरॉडोकली ओव्हर हॉलिंग प्रकारात बारा ते साडेबारा वर्षे झालेल्या अथवा 24 लाख किमी धावल्यावर दुरुस्ती होते. साधारणपणे एका इंजिनचे आयुर्मान 34 वर्ष असते. तर वजन 123 टन असते तर किंमत 10 ते 12 कोटी असते.

ठळक बाबी...

  • 200 इंजिन दुरुस्तीची दौंड लोको शेडची क्षमता - डब्ल्यूएजी 7 व 9 शक्तिशाली प्रकारातल्या इंजिनची दुरुस्ती होणार

  • व्हीव्हीव्हीएफ (व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी) या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार

  • अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे कमीत कमी ऊर्जेवर चांगल्या पद्धतीने इंजिन दुरुस्ती होईल

  • लोको शेडमध्ये केवळ तीन फ्रीज इंजिनची दुरुस्ती होणार

  • 600 ते 1 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार

दौंड लोको शेडचे काम वेगाने सुरू आहे; मात्र उर्वरित काम हे निधीअभावी रखडले असून, केंद्राने उर्वरित निधी द्यावा. रेल्वेमध्ये काळानुरूप बदल होत आहेत. दौंड लोको शेड सुरू झाल्यानंतर येथील स्थानिक नागरिकांना काम मिळणार आहे, त्यामुळे गावातील नागरिकांना काम मिळाल्याने गावाचे गतवैभव पुन्हा मिळणार आहे.

- विकास देशपांडे, दौंड - पुणे प्रवासी संघटना

दौंड लोको शेडचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम येत्या वर्षभरात पूर्ण केले जाणार आहे. सोलापूर विभागातील दौंड येथे इलेक्‍ट्रिक लोको शेड उभारण्यात येत आहे.

- अनुभव वार्ष्णेय, वरिष्ठ मंडल विद्युत इंजिनिअर, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT