Balkrishna Maharaj 
सोलापूर

बाळकृष्ण माऊली पुण्यतिथी सोहळ्यावर कोरोनाचे सावट; यावर्षीचा पुण्यतिथी सोहळा रद्द 

बिरप्पा करे

पाटकळ (सोलापूर) : नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील समर्थ सद्‌गुरू बाळकृष्ण महाराज यांची 50 वी पुण्यतिथी कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार असून, भाविक - भक्तांनी आपल्या घरीच श्री बाळकृष्ण माऊलींचे दर्शन घेऊन नामस्मरण करावे, असे आवाहन श्री स. स. बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांनी केले आहे. 

समर्थ सद्‌गुरू बाळकृष्ण महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा म्हणजे खऱ्या अर्थाने समस्त नंदेश्वरकरांना दिवाळीआधीच पुण्यतिथी सोहळा म्हणजे खऱ्या अर्थाने दिवाळी असते. मात्र सद्य:स्थितीत बाळकृष्ण माऊली पुण्यतिथी सोहळ्यावर कोरोनाचे सावट दिसून येत आहे. 

या सोहळ्यासाठी मुंबई, पुणे, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा येथील बाळकृष्ण माऊली भक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात. तसेच नंदेश्वर येथील सुवासिनी, माहेरवाशिणी आपल्या नंदेश्वर या मूळ गावी येऊन मोठ्या आनंदाने व उत्साहाने पुण्यतिथी सोहळा साजरा करीत असतात. मात्र, सध्या कोरोना संसर्गामुळे नित्य पूजा व परंपरेचे सांप्रदायिक कार्यक्रम करून हा पुण्यतिथी सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहनही मठाधिपती बाळासाहेब महाराज यांनी आपल्या समस्त गुरू बंधू - भगिनींना केले आहे. 

या वर्षीचा श्री स. स. बाळकृष्ण माऊली यांचा 50 वा पुण्यतिथी सोहळा कोरोनामुळे रद्द करण्यात आलेला आहे. तरी सर्व गुरू बंधू-भगिनींनी पुण्यतिथी सोहळ्याला उपस्थित न राहता आपल्या घरीच माऊलींचे नामस्मरण करून दर्शन घ्यावे. 
- बाळासाहेब महाराज, मठाधिपती, नंदेश्वर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

IND vs JPN, T20I: जपानने भारतीय संघाचा धूर काढला! श्रेयसचा संघ अवघ्या २ धावांनी जिंकला, फलंदाज गंडले, गोलंदाजही रडले

Marathi News Live Updates : राज्यात बहुंताश ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT