sand
sand  sakal
सोलापूर

वाळूचोरीत तरुणांचा सहभाग चिंताजनक!

हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा : वाळू चोरीच्या गुन्हेगारी क्षेत्रात तरुणांचा वावर चिंताजनक असून तरुणांना अवैद्य व्यवसायातून बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन परिवर्तन सारखी मोहीम राबवण्याचा विचार असल्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी व्यक्त केले.

लोक अदालतीचे समन्स बजावण्यासाठी शिरसी येथे गेलेल्या पोलिस गणेश सोलनकर याच्या अंगावर वाळूने भरलेले वाहन घालून ठार मारण्याच्या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे त्याबाबत पोलीस तपास कार्याचा आढावा व घटनास्थळ पाहणी व संबंधित आरोपीकडून याबाबत गुन्हे याबाबत विचारणा झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव,उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना विशेष महानिरीक्षक लोहिया म्हणाले की वाळू चोरी करणाऱ्याने पोलिसांच्या अंगावर वाहन घातल्याची घटना गंभीर असून या गुन्ह्यातील आरोपी वर यापूर्वी कसलेही गुन्हे दाखल झाले नाहीत.त्यामुळे त्यावर मोका ऐवजी आरोपीना कडक शासन होण्यासाठी आवश्यक ती कलमे लावण्यात आली असून त्यासंदर्भात पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे.वाळू चोरी प्रकरणात पोलिसांनी मोठ्या कारवाया केल्या आहेत.त्यात मंगळवेढ्यामध्ये 32 तर सांगोल्यामध्ये 96 गुन्हे दाखल केलेले आहेत.सध्या जिल्ह्य़ात वाळू साठे व वाळू माफीया नाहीत.सध्या पोलिसांनी वाळूवर केलेल्या कारवायातून वाहने जप्त करून पोलीस स्टेशनला आणली असून त्यांच्यावर कडक शासन होण्याच्या दृष्टीने देखील आवश्यक ते पुरावे न्यायालयात सादर केल्यामुळे भविष्यात यावर न्यायालयातूनही जरब बसेल.

येथील पोलीस स्टेशनमध्ये कारवाईतील जप्त केलेली वाहनांची संख्या पाहता संरक्षक भिंत बसवण्याबाबत चा प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्यात आल्याचे सांगून येथील सबजेल मधील आरोपी पळून जाण्याच्या घटनेबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.दारू धंद्यातील लोकांचे इतर व्यवसाय करण्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते नी राबवलेल्या ऑपरेशन परिवर्तन मोहिमेबद्दल समाधान व्यक्त केले.तर चोरी व दरोडा प्रकरणी रखडलेल्या तपासाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या.

कारवाई करताना अशा घटना घडू नयेत व कारवाई कशा पध्दतीने करावी याच्या सुचना पोलिसांना दिलेल्या पण घटनास्थळावरील परिस्थिती वेगळी असते.समाजाला सुरक्षा देणारा पोलीस व सीमेवर लढणारा जवान हा जीवाची पर्वा न करता काम करत असतो

कालच्या वाळू प्रकरणातील वाळू सह वाहन व त्यामध्ये सहभागी आरोपी हे शेजारच्या तालुक्यातील असून सदरची घटना मंगळवेढा तालुक्याच्या हद्दीत घडल्यामुळे या घटनेमुळे राज्यभर मंगळवेढ्याची मात्र बदनामी झाली. शेजारच्या तालुक्यातून वाळू आणून विक्री केली जात असल्यामुळे पोलिसांनी देखील यासाठी मोहीम उघडण्याची गरज असल्याचे तालुक्यातून बोलले जात आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: आरवली उड्डाणपूल मे अखेर होणार सुरु

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT