Madha_GP
Madha_GP 
सोलापूर

Gram Panchayat Results : माढ्यातील अंजनगाव उमाटे ग्रामपंचायतीमध्ये चार प्रस्थापितांना झटका ! युवकांची आघाडी विजयी 

किरण चव्हाण

माढा (सोलापूर) : माढा तालुक्‍यातील अंजनगाव उमाटे या ग्रामपंचायतीमध्ये एकत्रित आलेल्या चार प्रस्थापितांना युवकांच्या आघाडीने धक्का देत विजय मिळवला आहे. 

माढा तालुक्‍यातील अंजनगाव उमाटे या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेक वेळा एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हनुमंत पाडुळे, विलास कौलगे, रमेश उमाटे, शिराजभाई मुलाणी या प्रस्थापित नेत्यांनी या वेळच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. एकमेकांच्या विरोधात अनेकवेळा निवडणुका लढवून प्रास्थापित नेते एकत्र आल्याने या गावच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागून राहिले होते. 

या निवडणुकीत माढेश्वरी बॅंकेचे संचालक गणेश काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली व विजयकांत उमाटे यांच्या नेतृत्वाखाली ब्रम्हनाथ युवा आघाडीने एक जागा बिनविरोध जिंकली होती. उर्वरीत जागांसाठी निवडणूक लागली होती. यात प्रास्थापितांच्या ब्रह्मनाथ ग्रामविकास आघाडीच्या विरोधात विजयकांत उमाटे यांच्या नेतृत्वाखाली व गणेश काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हनाथ युवा आघाडीने विजय मिळविला आहे. ब्रह्मनाथ युवा आघाडीला सहा तर ब्रह्मनाथ ग्रामविकास आघाडीला तीन जागा मिळाल्या आहेत. 

अंजनगाव उमाटेमध्ये वृक्षारोपण, पर्यावरण, युवकांसाठी व्यायामाची सुविधा उपलब्ध करून देत काम करणाऱ्या युवकांच्या नेतृत्वावर ग्रामस्थांनी विश्वास टाकल्याने ही निवडणूक संपूर्ण तालुक्‍यात लक्षवेधी ठरली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : थंडा थंडा कूल कूल, विद्यार्थ्यांसाठी शाळेने बनवला वर्गातच स्विमिंग पूल

SCROLL FOR NEXT