bjp logo
bjp logo 
सोलापूर

पक्षनेत्याच्या वादात झेडपी प्रशासनाचा "प्रकाश' 

प्रमोद बोडके

सोलापूर : जिल्हा परिषदेतील पक्षनेते पद भाजपसाठी हास्याची मालिका ठरत आहे. बाहेरच्या केबिनमध्ये आनंद तानवडे तर आतल्या केबिनमध्ये अण्णाराव बाराचारे असे दोन पक्षनेते जिल्हा परिषदेला लाभले आहे. जिल्हा परिषदेचा अधिकृत पक्षनेता कोण? हा वाद कायम असतानाच आता या वादात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी उडी घेतली आहे. दोन्ही पक्षनेत्यांना त्यांनी आज सज्जड दम भरला असून तुमच्यातील वाद मिटवा नाही तर पक्षनेत्याच्या कार्यालयाला कुलूपच ठोकतो? असा इशारा दिला आहे. भाजप पक्ष नेत्याच्या वादात आता जिल्हा परिषद प्रशासनाने उडी घेतल्याने कार्यालयाला कुलूप लागणार का? भाजपमधील गटबाजी मिटणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
हेही वाचा - नापासांची पंचाईत! निकालानंतरही मिळेना उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी 
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही भाजप आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. विजयकुमार देशमुख हे राज्यमंत्री असतानाही सोलापूरचे पालकमंत्री झाले आणि सहकार खात्याचे कॅबिनेटमंत्री असतानाही सुभाष देशमुख यांच्याकडे सांगलीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली. सत्तेत आल्यापासून सुरू झालेला दोन्ही देशमुखांमधील वाद सत्ता गेल्यानंतरही मिटलेला नाही. आनंद तानवडे यांच्यासाठी माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख झटत आहेत. 
हेही वाचा - ठाकरे सरकारच्या पाच दिवसाच्या आठवड्याला उच्च न्यायालयात आव्हान 
अण्णाराव बाराचारे यांच्यासाठी माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख झटत आहे. 68 सदस्य संख्या असलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक 23 सदस्य आहेत तर त्या पाठोपाठ भाजपचे 14 आहेत. सभापती निवडीत भाजपला अपयश आले. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडीत भाजपच्या जिवावर मित्र पक्षांनी (स्थानिक आघाड्या) पदे मिळविली. भाजपच्या चिन्हावरील सदस्याला मात्र सभापती निवडीत सपाटून पराभव स्वीकारावा लागला. जे पद संवैधानिकच नाही त्यासाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने भाजपची गटबाजी जिल्ह्यासाठी मनोरंजनाचा विषय ठरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT