solapur
solapur 
पश्चिम महाराष्ट्र

वर्गमित्र सोमनाथनेच पाजले संयुक्ताला विष! 

परशुराम कोकणे

सोलापूर : सोमनाथ तारनाळकर (वय 24, रा. सोलापूर, मूळ- कलबुर्गी) याने प्रेमप्रकरणातून आपली कॉलेजमधील मैत्रीण संयुक्ता रमेश भैरी (वय 24, रा. मार्कंडेय वसाहत, सोलापूर) हिचा विष पाजून खून केला. त्यानंतर सोमनाथने विजयपुरात गोलघुमटावरून उडी मारून आत्महत्या केली, अशी माहिती सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी आज दिली. या घटनेला आजच बुधवारी एक महिना झाला. 

सोमनाथ आणि संयुक्ता चार वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. एकाच वर्गात असल्याने त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. याची कल्पना कॉलेजमधील मित्र-मैत्रिणींना होती. पोलिसांच्या चौकशीत अनेकांनी ही माहिती सांगितली आहे. ते नेहमीच एकमेकांना भेटायचे. 24 सप्टेंबरला संयुक्ता आणि सोमनाथची भेट झाली. चार वर्षांपासून चाललेल्या प्रेमाचा तो शेवटचा दिवस होता. दोघेही दुचाकीवरून मार्डी परिसरात गेले. पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून हे स्पष्ट झाले आहे. एकमेकांसोबत आयुष्य काढण्याचे स्वप्न पाहणाऱ्या संयुक्तासोबत सोमनाथचे भांडण झाले. त्यातूनच त्याने विष पाजवून संयुक्ताचा खून केला. या घटनेनंतर तो विजयपुरात गेला. त्याने गोलघुमटावरून उडी मारून आपला शेवट केला. 

गेल्या महिन्याभरात केलेल्या पोलिस चौकशीत ही माहिती समोर आली. बंदोबस्त आणि इतर तपासांमुळे व्यस्त असल्यामुळे तालुका पोलिसांनी अद्याप ही माहिती रेकॉर्डवर घेतली नाही. येत्या आठवड्यात सर्व माहिती रेकॉर्डवर घेणार असल्याचे पोलिस निरीक्षक पाटील यांनी सांगितले. 

कशी घडली घटना -
- 24 सप्टेंबर 2018 रोजी घटना 
- संयुक्ता आणि सोमनाथची शेवटची भेट 
- दुचाकीवरून दोघेही मार्डी परिसरात गेले 
- मार्डी परिसरात सापडला संयुक्ताचा मृतदेह 
- सोमनाथची गोलघुमटावरून उडी मारून आत्महत्या 

प्रेमप्रकरणातून सोमनाथ आणि संयुक्तामध्ये भांडण झाले. याच कारणावरून सोमनाथने संयुक्ताचा खून केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. यासंदर्भातील कॉल रेकॉर्डही मिळाले आहेत. या आठवड्यात ही माहिती आम्ही रेकॉर्डवर घेणार आहोत. 
- विजय पाटील, 
पोलिस निरीक्षक, तालुका पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT