son killed parents over ration card police custody family dispute
son killed parents over ration card police custody family dispute Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangola Crime News : आई-वडिलाचा खून, रेशन कार्ड देत नसल्याच्या कारणावरून कृत्य; मुलास कोठडी

सकाळ वृत्तसेवा

Sangola News : पाचेगाव बुद्रूक (ता. सांगोला) येथील वृद्ध दांपत्याचा खून मुलानेच केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. आई- वडिलांसमवेत एकत्रित असलेले आपले रेशन कार्ड आई- वडील देत नसल्याच्या किरकोळ कारणावरून मुलानेच आई-वडिलांचा खून केला.

याप्रकरणी पोलिसांनी समाधान भीमराव कुंभार (वय ४२, रा. पाचेगाव बु., ता. सांगोला) यास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिल्याची माहिती निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी दिली आहे.

पाचेगाव बुद्रूक (ता. सांगोला) येथील वृद्ध पती-पत्नीचा अज्ञात व्यक्तीने, अज्ञात कारणाने शुक्रवारी (ता. १) सायंकाळी सव्वा सहापूर्वीच खून केल्याची तक्रार नातवाने पोलिसांत दिली होती. वृद्ध पतीचा लोखंडी मेख गळ्यात आरपार खुपसून तर पत्नीस गळ्याला काळी केबल गुंडाळून आणि डोक्यामागे मारहाण करून खून करण्यात आला होता.

यामध्ये भीमराव गणपत कुंभार (वय ७०) व सुशीला भीमराव कुंभार (वय ६५, रा. पाचेगाव डोंगर, ता. सांगोला) या वृद्ध दांपत्याचा मृत्यू होता. याबाबत मृताचा नातू सागर रामचंद्र कुंभार (रा. करगणी, ता. आटपाडी, जि. सांगली) याने पोलिसांत फिर्याद दिली होती.

पोलिसांनी सर्व बाजूने तपास करून व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मृत दांपत्याचा मुलगा समाधान कुंभार याची सखोल चौकशी केली. पोलिसांच्या चौकशीमध्ये समाधान कुंभारने आपणच आई- वडिलांचा खून केल्याचे सांगितले.

आपले एकत्रित असणारे रेशन कार्ड आई- वडिलांकडे होते. ते रेशन कार्ड परत देत नसल्यामुळे चिडून जाऊन मुलानेच आई- वडिलाचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी सांगितले.

या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने यशस्वी केला आहे.

पाचेगाव बुद्रूक येथील वृद्ध पती-पत्नीचा खून झाल्यानंतर तेथे श्वानपथक, फिंगर प्रिंट एक्स्पर्ट, फॉरेन्सिक डिपार्टमेंट यांच्याकडून घटनास्थळाचा तपास करण्यात आला. सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथील तीन तज्ज्ञ डॉक्टरांकडून शवविच्छेदन करण्यात आले.

वृद्ध दांपत्याचा खून कशाकरिता करण्यात आला, याचा तपास करणे कठीण होते; परंतु नेमलेले पोलिस पथक, गोपनीय माहितीच्या आधारे रेशन कार्ड न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मुलानेच आई- वडिलाचा निर्घृणपणे खून केल्याचे उघड झाले आहे. संशयित आरोपीस नऊ मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असून अधिक तपास सुरू आहे.

- भीमराव खणदाळे, पोलिस निरीक्षक, सांगोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: "विक्रमी संख्येने मतदान करा," पंतप्रधान मोदींचे मराठीतून आवाहन

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

SCROLL FOR NEXT