पश्चिम महाराष्ट्र

काँग्रेस कार्यकर्त्यांची फौज तयार करणार - सोनल पटेल 

सदानंद पाटील

कोल्हापूर - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी प्रशिक्षीत काँग्रेस कार्यकर्त्यांची फौज तयार करण्यात येत आहे. ही फौज नेटाने व ताकतीने प्रचारात उतरेल, असा विश्‍वास काँग्रेसच्या पश्‍चिम महाराष्ट्र सहप्रभारी सोनल पटेल यांनी व्यक्‍त केला. काँग्रेस पक्षाच्यावतीने फुलेवाडी येथील एका हॉलमध्ये दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास सुरुवात झाली. यावेळी त्या बोलत होत्या. 

कार्यक्रमास काँग्रेसचे सरचिटणीस आमदार रामहरी रुपणवार, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, महापौर शोभा बोंद्रे, माजी खासदार कलप्पाण्णा आवाडे, जयवंतराव आवळे, माजी आमदार प्रकाश आवाडे, भरमूअण्णा पाटील, संजीवनीदेवी गायकवाड यांच्यासह यशवंत हप्पे, प्रवक्‍ते हरिष रोगे, प्रल्हाद चव्हाण, अलका राठोड, रेखा नायर यांच्यासह मुख्य प्रशिक्षक राजीव साहू, प्रशिक्षक चैतन्य रेडडी, राजेंद्र वानखेडे, विनोद नायर, अल नासिर झकेरिया आदी उपस्थित होते. 

पटेल म्हणाल्या, काँग्रेस पक्षाध्यक्ष झाल्यापासून राहूल गांधी यांनी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा आग्रह धरला होता. एनएसयुआय, युथ काँग्रेसमध्ये त्यांनी अशाप्रकारे प्रशिक्षण घेतले होते. अशाच पध्दतीने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण अत्यंत गरजेचे असून यातूनच चांगले वक्‍तृत्व असणाऱ्या कार्यकर्त्यांवर पुढील प्रशिक्षणाची जबाबदार देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

आमदार रुपणवार म्हणाले, काँग्रेस कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी या प्रशिक्षणाची गरज होती. काँग्रेसवर होणारे आरोप खोडून काढून विद्यमान सरकारचे घोटाळे जनतेसमोर आणण्याची महत्वाची जबाबदारी या कार्यकर्त्यांना पार पाडावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले, 60 वर्षे काँग्रेसने काय केले, असा प्रश्‍न करणाऱ्या सरकारने गेल्या चार वर्षात काय दिवे लावले, हे विचारण्याची वेळ आता आली असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रशिक्षण घेतले तरच तिकीट 
काँग्रेसच्या शिबिरासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना दोन दिवस पूर्ण वेळ प्रशिक्षण घ्यायचे आहे, अशा सुचना वारंवार देण्यात येत होत्या. जो या शिबिरास दोन दिवस उपस्थित राहील, त्यालाच प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ज्यांच्याकडे प्रमाणपत्र असेल त्यांना नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीची उमेदवारी दिली जाईल, असे आमदार रुपणवार वारंवार सांगत होते. 

आमचे नेते वेळ कधी पाळणार 
सकाळी 9 वाजता या शिबिराला सुरुवात होणार होती. चंदगड, राधानगरी, शाहूवाडी यासारख्या दुर्गम तालुक्‍यातून कार्यकर्ते वेळेत उपस्थित होते. जिल्ह्यातील प्रमुख नेतेही कार्यक्रमास उपस्थित होते. मात्र प्रमुख पाहुणेच वेळेत पोहोचले नाहीत. त्यामुळे हा कार्यक्रम तब्बल सव्वा दोन तास उशीरा सुरु झाला. सत्ता गेली तरी आमच्या नेत्यांमध्ये फरड पडत नसल्याची भावना, काही कार्यकर्त्यांनी व्यक्‍त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

Team India Jersey: टीम इंडियाची T20 जर्सी जेठालालसारखी! सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस, भन्नाट मीम्स व्हायरल

BJP Manifesto : विकसित पुणे घडविणारे ‘संकल्पपत्र’ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रकाशित

SCROLL FOR NEXT