"Speed" petrol crosses hundreds in Sangli
"Speed" petrol crosses hundreds in Sangli 
पश्चिम महाराष्ट्र

"स्पीड' पेट्रोलची सांगलीत शंभरी पार 

घनशाम नवाथे

सांगली : गेल्या दीड महिन्यापासून पेट्रोल दर नव्वदपासून वाढतच चालला आहे. सध्या साध्या पेट्रोलचा दर शंभरीच्या उंबरठ्यावर असून स्पीड तथा पॉवर पेट्रोलने मात्र शंभरी ओलांडली आहे. त्याचा दर शंभर रुपये 52 पैसे झाला आहे. 

दिवाळीनंतर पेट्रोल दरात सातत्याने वाढच होत चालली आहे. त्यामुळे दर वाढीच्या विरोधात सातत्याने आंदोलने होत आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा सर्वांनाच फटका बसला आहे. कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. तशातच पेट्रोल-डिझेल दरवाढ होत आहे. सोबतीला गॅस दरवाढीचाही भडका उडाला आहे. इंधन दरवाढीची गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर देखील पेट्रोल दरवाढीवरून सरकारला टार्गेट केले जात आहे. 

पेट्रोल दर जेव्हा 70 च्या पुढे होता. तेव्हापासून अनेकजण किती रुपये लिटर याचा विचार न करता पंपावर थेट शंभर रुपयांचे पेट्रोल टाकत होते. शंभर रुपयांचे पेट्रोल टाकले तर दोन-चार दिवस पुरत होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून दर वाढत असल्याचा परिणाम म्हणून शंभर रुपयांचे पेट्रोल टाकल्यानंतर एक-दोन दिवसात "स्पीडोमीटर' चा काटा सतत "डाऊन' होत आहे. जानेवारी महिन्याच्या सुरवातीला पेट्रोलने नव्वदी पार केल्यानंतर सगळीकडे आंदोलनाचा देखील भडका उडाला आहे. 

पेट्रोलचा सध्याचा दर शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. दोन दिवसांत दरवाढ झाली नाही, मात्र आठवडाभरातच कदाचित शंभरी ओलांडली जाईल असे चित्र आहे. तर दुसरीकडे पॉवर तथा स्पीड पेट्रोलने मात्र शंभरी ओलांडली आहे. 

पेट्रोल-डिझेलचा दर 

  • साधे पेट्रोल- 97.14 रुपये प्रति लिटर 
  • स्पीड/ पॉवर- 100.52 रुपये प्रति लिटर 
  • डिझेल- 86.93 रुपये प्रति लिटर 
  • टर्बो डिझेल- 90.15 रुपये प्रति लिटर 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT