Spotted owlet was stuck for three days in Manja
Spotted owlet was stuck for three days in Manja 
पश्चिम महाराष्ट्र

तीन दिवसांपासून मांजात अडकला होता पिंगळा! 

परशुराम कोकणे

सोलापूर : रेवण सिद्धेश्‍वरनगर परिसरात विजेच्या तारेला गुंडाळलेल्या पतंगाच्या मांजात तीन दिवसांपासून अडकलेल्या पिंगळा पक्ष्याची वन्यजीव प्रेमींनी सुटका केली. 

अमोल जमादार यांनी वन्यजीवप्रेमी संस्थेचे प्रमुख मुकुंद शेटे यांच्याशी संपर्क साधून पिंगळा मांजामध्ये अडकल्याचे सांगितले. तत्काळ वन्यजीवप्रेमी संस्थेचे सदस्य मुकुंद शेटे, सुनील अरळ्ळीकट्टी, निकंदन जंगम, मल्लिकार्जुन धुळखेडे व ऍनिमल राहतचे अजित मोटे, भीमाशंकर विजापुरे यांनी धाव घेतली.

वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता अमेय केत यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तत्काळ अभियंता कुंभार यांचा मोबाईल नंबर दिला. 15 मिनिटांतच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. महानगरपालिकेचे अभियंता परदेशी यांनी विजेच्या तारेपर्यंत पोचण्यासाठी बास्केट गाडी पाठवून दिली. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर बचाव मोहिमेस सुरवात झाली. बास्केटमध्ये थांबनू भीमाशंकर विजापुरे पिंगळा पक्ष्यापर्यंत पोचले. पतंगाचा मांजा पिंगळा पक्ष्याभोवती गुंडाळला गेला होता. कात्रीने मांजा कापून पिंगळा पक्ष्याची सुटका करण्यात आली. पुढील उपचारासाठी पिंगळा पक्ष्याला ऍनिमल राहतच्या पथकाकडे स्वाधीन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT