पश्चिम महाराष्ट्र

सातारा : खारुताईची शाळेत धमाल मस्ती

ओंकार कदम

सातारा ः खार हा तसा भित्रा प्राणी आहे पण साताऱ्यातील एका शाळेत माणसाळलेली खार तुम्हांला पाहवयास मिळेल. हो माणसाळेली खार. आश्‍चर्य वाटले ना तुम्हांला. पण हे खरे आहे. साताऱ्यातील पालिकेच्या शाळा क्रमांक सहा म्हणजेच ज्ञानगंगा विद्यामंदिर येथे दररोज एक खारुताई येते. ती ना शिक्षकांना घाबरते ना मुलांना. ती विद्यार्थ्यांच्या वह्यांवर बसते, पुस्तकांशी खेळते. तिला मुलांचा आणि मुलांना तिचा लळा लागला आहे.
 
सातारा पालिकेच्या शहारातील विविध भागात एकूण 18 शाळा आहेत. त्यामधील काही शाळांचा परिसर वृक्षांनी बहरला आहे. त्यापैकीच एक शाळा क्रमांक सहा म्हणजेच ज्ञानगंगा विद्यामंदिर. या शाळेची घंटा वाजली की विद्यार्थ्यांप्रमाणे एक छोटीशी खारुताई बिंदास्त शाळेत येते. केवळ शाळेत येत नाही तर वर्गात जाऊन बसते. कधी ती विद्यार्थ्यांच्या पुस्तकांवर असते तर कधी वह्यांवर.

हेही वाचा - साडेचार कोटींच्या दरोड्याचा चार तासांत पर्दाफाश

एकवेळ आम्ही शाळेत येणार नाही परंतु खारुताई येईल असे गमतीने विद्यार्थी सांगतात. विद्यार्थी म्हणतात आमचा वर्ग संपेपर्यंत खारुताई वर्गातच बसून असते. आम्ही मैदानावर गेलो की खारुताई आमच्या पाठीमागे पळत येते. तर कधी आम्ही तिच्या मागे पळत जातो. मैदानावर आम्ही धमाल करतो. तिचा आम्हांला कोणताही त्रास होत नाही. खारुताईच्या येण्याने आम्हांला खूप आनंद होतो.

दरम्यान या शाळेच्या शिक्षकांना जेव्हा खारुताईची माहिती मिळाली तेव्हा तिला विद्यार्थ्यांकडून इजा होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. आता तर मुलांबरोबर शिक्षकांना देखील तिचा लळा लागल्याचे जाणवते. खर तर मुलांना शिक्षकांची भिती वाटते. पण या खारुताईला वाटत नाही. तिला आमची सवय झाल्याचे विद्यार्थींनीने सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Pune MLC Election: शिक्षक, पदवीधर’ची आजपासून रणधुमाळी ;दोन दिवसांत जागा वाटप; सहा ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT