for ST employees protest in belgaum students and teachers face transport problem in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात संपामुळे शहरासह ग्रामीण बससेवा बंदच ; विद्यार्थी, शिक्षक अडचणीत

सतीश जाधव

बेळगाव : विविध मागण्यांसाठी परिवहनच्या चालक आणि वाहकांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे गेल्या चार दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागातील बससेवा बंदच आहे. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाला दांडी मारावी लागली तर शिक्षकांना इतरांच्या वाहनांचा आधार घेऊन शाळेला जावे लागले. संपात वाढ झाल्यास शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

परिवहन कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून (11) आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. रविवारी (12) राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या दहा पैकी आठ मागण्या मान्य केल्या आहेत. तरी देखील बेळगाव विभागातील कर्मचाऱ्यांना आपला संप सुरुच ठेवला आहे. सोमवारीही हा संप सुरुच होता. परिवहन कर्मचाऱ्यांनी अचानक केलेल्या संपामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शुक्रवारी (11), शनिवारी (12) महाविद्यालयाला जाता आले नाही. रविवारी सुट्टी असल्याने समस्या आली नाही. मात्र, सोमवारी (14) हा तिढा संपेल असे वाटत होते. मात्र, सोमवाही आंदोलन कायम असल्याने बस आगारातच थांबून होत्या.

दुचाकी असलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय गाठले. मात्र, विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाता आले नाही. बससेवा सुरु झाल्यानंतरच महाविद्यालये सुरळीत होणार आहेत. शहरासह ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा सुरु नसल्या तरी शिक्षकांना शाळेत जावे लागत आहे. अनेक शिक्षक बसनेच प्रवास करतात. मात्र, चार दिवस बस बंद असल्याने शिक्षकांनाही अडचणी आल्या. काही शिक्षकांना इतरांच्या दुचाकी व चारचाकीचा आधार घ्यावा लागला.


आरसीयू कोर्सवर्क उद्या

राणी चन्नमा विद्यापीठाच्या (आरसीयु) पीएचडी विद्यार्थ्यांचे शनिवारी (ता. 13) होणारे कोर्सवर्क मंगळवारी (ता. 15) होणार आहेत. मात्र, सोमवारपर्यंत परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरुच होता. मंगळवारीही संप सुरुच राहिल्यास विद्यार्थ्यांना अडचणी येणार आहेत. त्यामुळे, मंगळवारी कोर्सवर्कला कसे हजर राहावे हा प्रश्‍न विद्यार्थ्यांना पडला आहे. यासंबंधी मोबाईलवर संदेश पाठवून परीक्षा असल्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT