mohol
mohol 
पश्चिम महाराष्ट्र

गोवर आणि रुबेला निंयत्रण मोहीमेचा मोहोळ तालुक्यात प्रारंभ 

चंद्रकांत देवकते

मोहोळ (सोलापूर) - येथील देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालयामध्ये गटविकास अधिकारी अंजिक्य येळे यांचे हस्ते गोवर व रूबेला लस घेतलेल्या विद्यार्थ्याना प्रमाणपत्र देत गोवरचे दुरीकरण व रूबेलावर निंयत्रण या मोहीमेचा  शुंभारंभ करण्यात आला. 

यावेळी बोलताना अंजिक्य येळे म्हणाले 'आपल्या भारत देशाने गोवरचे दुरीकरण आणी रुबेलाचे नियंत्रण ठेवण्याचा दृढनिश्चय केला आहे. या राष्ट्रव्यापी मोहीमेद्वारे ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सर्व मुला - मुलींना लस दिली जाईल. सर्व सरकारी, निम-सरकारी, खाजगी शाळा, मिशनरी शाळा, मदरसे, बालवाड्या, अंगणवाड्या यातुन लसीकरण केले जाईल. जी मुले शिक्षणापासून वंचित असतील त्या सर्व मुलांना त्यांच्या वस्तीपर्यंत जाऊन लसिकरण केले जाईल. सरकारी व निम-सरकारी रूग्णालयात लसिकरण कक्ष असेल. लसिकरण झाल्यावर त्या लाभार्थी बालकाचे डाव्या हाताच्या अंगठ्यावर मतदान केल्यानंतर करतात तसे मार्किंग केले जाईल. तरी या राष्ट्रीय कार्यामध्ये सर्वाचाच सहभाग व सहकार्य महत्वाचे आहे. 

यावेळी तालुका वैद्यकिय अधिकारी अरूण पाथरूडकर, शिरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.वाय. जी. जगताप, आरोग्य सहाय्यक अरुण पाटील, पंडीत व्हनचेंजे, विस्तार अधिकारी दादाराव बोराडे, तालुका सुपरवायझर अरविंद गायकवाड मुख्याध्यापिका दिपमाला देशमुख उपस्थित होते. यावेळी प्रशालेतील १३१७  विद्यार्थ्याना गोवर, रूबेला लस देण्यात आली. यासाठी एकूण आठ टिम करण्यात आल्या होत्या यामध्ये प्रशिक्षीत आरोग्य सेविका, आशावर्कर सहभागी झाल्या होत्या. यासाठी आरोग्य विभागातील श्रीमती एस.ए. अरब, सी के आलंदी, एल जे पाटील, एस जे मुल्ला, सी एस ठावरे, ए.एल भगत, एम.आर. मगर, पी .एस सिंगन, ए.एम. माढेकर, जी.जी. सासुरे, पी.यु.लोंढे, जोकार डी.टी., पवार एस एस, खान आर आर, निंकबे एन.जे, आदीनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT