Start power substation in Arwade village immediately 
पश्चिम महाराष्ट्र

आरवडे गावात वीज उपकेंद्र सुरु तत्काळ सुरू करा

रविंद्र माने

तासगाव : तासगांव तालुक्‍यातील आरवडे गावात केंद्राची संसद आदर्श गाव संकल्पना खासदार संजय पाटील यांच्यावतीने राबविण्यात आली. त्याअंतर्गत आरवडेत 33/11 के.व्ही. उपकेंद्र मंजूरही झाले. आजअखेर निविदा न काढल्याने हे काम अजून रखडले आहे. रखडलेले काम तातडीने करून आरवडेत वीज उपकेंद्र सुरु करावे, अशी मागणी युवा नेते, एनएसयुआयचे राज्य सरचिटणीस राजीव मोरे यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे मुंबई येथे केली. त्यावेळी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते. 

आरवडेतील वीज उपकेंद्र होणे महत्वाचे आहे. या भागात ताकारी,पुणदी-विसापूर पाणी योजना कार्यरत आहेत. हातनूर, बोरगाव, शिरगाव शाखे अंतर्गत 40 नवीन रोहित्रे मंजूर आहेत. रोहित्राचे अंदाजपत्रक वरीष्ठ कार्यालयास मंजुरीसाठी पाठवलेले आहे. कामे तातडीने पुर्ण झाल्यास शेतीला योग्य दाबाने वीज पुरवठा होणार आहे. रोहित्रे जळण्याच्या घटनाही टळतील. एकूणच वीज पुरवठा सुरळीत व सुरक्षित होईल, असे निवेदनात म्हटले आहे. 

दरम्यान, श्री. राऊत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागाला उचित कारवाईचे आदेश दिले आहेत. काही दिवसांतच वीज उपकेंद्राच्या निविदा कार्यान्वित केल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

SCROLL FOR NEXT