sangli st aagar.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

परप्रांतियांना सुखरूप सोडण्यासाठी "लालपरी' सज्ज

सकाळवृत्तसेवा

सांगली- "कोरोना' च्या पार्श्‍वभूमीवर "लॉकडाउन' केल्यामुळे सांगलीत अडकून पडलेले परप्रांतीय विद्यार्थी आणि मजुरांना सोडण्यासाठी सांगली विभागातील 800 बसेस सज्ज झाल्या आहेत. प्रशासनाकडून आदेश आल्यानंतर या बसेस सांगलीच्या सीमा ओलांडून धावतील. सेलम (तामिळनाडू) येथील विद्यार्थी तसेच विजापूर (कर्नाटक) येथील वीटभट्टी कामगारांना सोडण्यासाठी पहिल्या टप्प्यात बसेस निर्जंतुकीकरण करून सज्ज आहेत.

 
"लॉकडाउन' आणि संचारबंदीमुळे जिल्ह्यात अडकून पडलेल्या ऊसतोड मजुरांसाठी काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातून बसेस धावल्या. त्यानंतर "लॉकडाउन' शिथील केल्यानंतर परप्रांतिय विद्यार्थी व मजूर गावाकडे जाण्यास प्रयत्न करीत आहेत. त्यापैकी अनेकांनी परवान्यासाठी नोंदणी केली आहे. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात सांगली आगारातून सेलम येथे जाण्यासाठी पाच आणि मिरज आगारातून सहा बसेस तांत्रिक तपासणी करून सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. या बसेसमध्ये महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागाने औषध फवारणी करीत सर्व बसेस निर्जंतुक करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या सूचना आल्यानंतर सर्व बसेस आज परप्रांतीय विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पाठविल्या जातील. 

दरम्यान जिल्ह्यात वीटभट्टीवर कार्यरत असलेल्या मजुरांना विजापूर (कर्नाटक) येथे गुरूवारी (ता.7) सोडण्यासाठी 15 बसेस देखील सज्ज ठेवल्या आहेत. एसटीच्या विभाग नियंत्रक अमृता ताम्हनकर यांनी आज प्रवासासाठी सज्ज असलेल्या बसेसची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना सूचना केल्या. महापालिका आरोग्य विभागाकडून या बसेस निर्जंतुक करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ आगर व्यवस्थापक दिलीप पाटील, कनिष्ठ आगार व्यवस्थापक दीपक हेतांबे, स्थानक प्रमुख दीपक खिलारे, वाहतूक निरीक्षक प्रवीण डोंगरे, वर्कशॉप इंनचार्ज प्रवीण कोळी, हेड पॅकेनिक पटेल, श्री. मोरे, राजू भावी, पिंटू ठाकूर आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT