aandhalgaon
aandhalgaon 
पश्चिम महाराष्ट्र

आंधळगावातील शेतकऱ्यांनी केले काम बंद आदोलन

प्रशांत माळी

आंधळगाव - तालुक्यातील रत्नागिरी नागपूर या महामार्गाच्या कामासाठी आंधळगावातील शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीला योग्य मोबदला न दिल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी या महामार्गाचे काम आज बंद ठेवले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 या रस्त्याचे विस्तारीकरणाच्या कामासाठी संपादीत जमीनीचा मोबादला निवडुणक आचार संहिता लागल्यामुळे जमिन अधिग्रहण केलेल्या लोकांचा मोबदला मिळेना अधिग्रहीत जमीनीचा मोबदला तात्काळ आदा करावे.त्याचबरोबर ज्या जमिनीचा अधिकृत जमिनीमध्ये समावेश नाही ही अशा जमिनीचा अधिग्रहण करून त्या जमिनीचा मोबदला तात्काळ मिळावा, काही ठिकाणी घरे व झाडांची मूल्यांकन झालेली नाही त्याचे मूल्यांकन करून त्याचा मोबदला लवकरात लवकर मिळावा काही ठिकाणी कमी जमीन अधिग्रहित दाखवलेली आहे परंतु प्रत्यक्षात ज्याला जमीन अधिग्रहित झालेली आहे त्याची पुर्रसर्वेक्षण होऊन योग्य मोबदला मिळावा.मोबदला असा केलेल्या जमिनीवर काम सुरु ठेवावे आदी मागण्याबाबत उपविभागीय अधिकारी कडे तक्रार केली होती दरम्यान उपविभागीय अधिकारी यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने आज काम अडविले.घटनास्थळी तहसिलदार रावडे हजर होवून ग्रामस्थांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

या वेळी दिनकर भाकरे, जितेंद्र लेंडवे, जनार्धन पाटिल, विष्णू बनसोडे, समाधान लेंडवे, काका भिंगे, नंदू माळी, संतोष लेडवे, अमोल लेडवे, बंडु माळी, विष्णु माळी, आदि शेतकरी उपस्थित होते.

संपादित जमीनीचे  पैसे देण्याबाबत तक्रार करूनही दखल न घेतल्याने आम्ही काम थांबवले. वीस शेतकरी वंचीत आहेत.
 - दिनकर भाकरे, आंधळगाव

मी प्रत्यक्ष बांधीत शेतकय्रांची भेट घेवून समजूत काढली असून बांधीत जमीनीचा मोजणी करून योग्य मोबादला दिला जाईल कुणावरही अन्याय केला जाणार नाही..
- स्वप्निल रावडे तहसिलदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT