जोरदार विजांचा कडकडाट सुरू होता. झाड तोडताना पालिका कर्मचारी.
जोरदार विजांचा कडकडाट सुरू होता. झाड तोडताना पालिका कर्मचारी.  sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात वादळी पावसाने दाणादाण...

सकाळ वृत्तसेवा

शहर आणि परिसरात शनिवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने पार दाणादाण उडवून दिली. तुफान झालेल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाण्याची तळी निर्माण झाली. तसेच शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. तसेच वीजपुरवठाही खंडित झाला होता.

सांगली - महापालिका क्षेत्रात शनिवारी मध्यरात्रीनंतर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने विविध भागातील अनेक झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी वाहनांवर झाडे कोसळली तर काही ठिकाणी रस्त्याच्या मध्येच झाडे कोसळल्याने वाहतूक खोळंबली गेली. महापालिकेने तातडीने ही झाडे हटवून रस्ते मोकळे केले. कालच्या पावसाने सांगलीकरांना तुफानी वादळाची जाणीव झाली. सोसाट्याचा वारा त्यातच ढगांच्या कडकडाटासह चमकणाऱ्या विजा आणि जोरदार पाऊस असे चित्र मध्यरात्री अडीचपासून सुमारे तास-दीड तास दिसत होते. या मुसळधार गोष्टीने अनेक भागात मोठ्या प्रमाणात झाडे पडली. नारळाच्या झाडाच्या झावळ्या पडल्या होत्या.

काही ठिकाणी विजेच्या तारांवर झाडे पडल्याने विद्युतप्रवाह खंडित झाला संजय नगर परिसरात तर एक खांब अर्ध्यातून तुटून रस्त्यावर पडला होता अंकली फाट्यावर पोला जवळच मोठे झाड रस्त्यावर पडल्याने मध्यरात्रीच वाहतुकीला अडचण निर्माण झाली होती. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी सकाळी लवकरच पडलेली झाडे हटवण्याच्या कामास युद्धपातळीवर लागली. सावळी रोडवर, उमाजी नाईक शाळेजवळ मिरज रस्त्यावर पाच झाडे पडली होती. सदरची झाडे अग्निशामक दलाच्या जवानांनी बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला. तसेच संजय नगर येथील देवकुळे हॉस्पिटल समोरील रोड, यशवंत नगर जैन बस्ती शेजारी, साखर कारखाना समोरील मेन रोडवर पडलेली झाडेही अग्निशामक दलाच्या जवानांनी कटरने कापून बाजूला केली. नगरसेवक संतोष पाटील यांनी वार्ड क्रमांक नऊमध्ये आरवाडे पार्क, मंगल कॉलनी, महात्मा गांधी कॉलनी, जय हिंद कॉलनी, हरीश हॉटेल समोरील रोड या परिसरात पडलेली झाडे महापालिका आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने काढली व रस्ता मोकळा करून दिला. अंकलीजवळच्या कृष्णा नदीच्या पुलाशेजारीच उतरतीला एक मोठं झाड पडले होते. रात्री तीनच्या सुमारास नगरसेवक अभिजीत भोसले हे कोल्हापूरहून येत असताना त्यांना हे झाड दिसले त्यांनी तातडीने याची माहिती जयसिंगपूर आणि सांगली ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनी या ठिकाणी बरिकॅडेस लावून रस्ता बंद केला.

शहरात तळी; उपनगरात दलदल

सांगली - शहर आणि परिसरात मध्यरात्रीनंतर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शहराची पार दाणादाण उडवून दिली. शहरातील सखल भागात पाण्याची तळी निर्माण झाली होती. तसेच अनेक भागातील गटारी ओसंडून वाहत होत्या. शामरावनगरसह विश्रामबागमधील विस्तारीत भागातील रस्ते चिखलमय झाले होते. यामुळे आज सकाळी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली. शनिवारी दिवसभर प्रचंड उकाडा होता. वारे अजिबात नव्हते. घामाच्या धारा लागल्या होत्या. रात्री चांदणे होते. रात्री बारानंतर वातावरण बदलत गेले. मध्यरात्रीच्या दोनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पुढच्या तासाभरात भीती वाटावी, असे वातावरण तयार झाले. विजांचा प्रचंड कडकडाट सुरू झाला. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि तुफान पाऊस असे सारे अर्धा तासावर सुरू होते. तुफान झालेल्या पावसानेमुळे शहरात ठिकठिकाणी पाण्याची तळी झाली. मारूत रस्ता, झुलेलाल चौक, स्टेशन चौक, विश्रामबाग चौकांसह उपनगरातील सखल भागात पाणीच पाणी होते. तसेच शामरावनगर, दत्तनगर भाग, कोल्हापूर रस्ता, विजयनगरसह विस्तारीत भागात रस्ते चिखलमय झाले होते. काही भागात गटारी ओव्हलफ्लो झाल्या होत्या. तुफान झालेल्या पावसाने शहराची पार दाणादाण उडवून दिली. महापालिका प्रशासनाकडून अद्यापही माॅन्सूनपूर्व मोहीम हाती घेतली नाही. नालेसफाईसह विविध कामे यात केली जातात. कालच्या झालेल्या पावसाने शहराची ही अवस्था झाली. त्यामुळे नागरीकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. शहरातील अनेक भागातील झोपडपट्ट्यांचे पत्रे उडवून गेले. तसेच महापालिकेच्या वतीने येथील समर्थ घाटावर उभारण्यात आलेल्या जत्रेतही काही प्रमाणात नुकसान झाले. मात्र सायंकळी पुन्हा पूर्ववत झाले. एकंदरीतच कालच्या पावसाने शहराची पार दाणादाण उडवून दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT