abhijeet choudhari
abhijeet choudhari 
पश्चिम महाराष्ट्र

वरदहस्त कुणाचाही असो, त्यांची गय नाही... जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

सकाळवृत्तसेवा

सांगली ः प्रशासनातील कोणत्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कुणी हल्ला केला तर त्याची गय केली जाणार नाही. मग तो कुणीही असो. कुणाचाही राजकीय दबाव न घेता त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी परखड भूमिका जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज येथे मांडली.

जिल्हाधिकाऱ्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देताना डॉ. चौधरी यांनी कडक कारवाईचे संकेत दिले. इस्लामपूर येथे नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांच्यावर नगरसेवक खंडेराव जाधव यांनी खुर्ची उगारत धमकी दिली होती. त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे.

त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरु झाली आहे. त्याचवेळी विटा येथे माजी जिल्हा परिषद सदस्य व डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी तहसिलदारांना मारहाण केली आहे. या दोन्ही प्रकरणातील संशयित हे राजकीय पक्षाचे नेते आहेत. या पार्श्‍वभूमीवर डॉ. चौधरी यांनी कडक कारवाई होईल, असे स्पष्ट केले.


डॉ. चौधरी म्हणाले, ""हल्ला करणाऱ्यांवर कुणाचाही वरदहस्त असला तरी त्याची गय केली जाणार नाही. या प्रकरणात अद्याप तरी कुणाचा राजकीय हस्तक्षेप झालेला नाही. तो होऊ देणार नाही. हे प्रकरण गंभीर आहे आणि तितक्‍याच गांभिर्याने त्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मी त्याबाबत पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्याशी चर्चा करतो आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी महायुतीच्या नेत्यांची पुण्यात बैठक

SCROLL FOR NEXT