पश्चिम महाराष्ट्र

कसबा बावडा... महापालिका शाळा ते कतार एअरवेज

सकाळवृत्तसेवा

कसबा बावडा - प्रबळ इच्छाशक्ती, कष्टाची तयारी आणि जिद्द असेल तर कोणतेही ध्येय साध्य करू शकतो, हेच कसबा बावडा येथील सुहास श्रीमंत जाधव याने दाखवून दिले आहे. महापालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या सुहासने कतार एअरवेज या कंपनीत विविध परीक्षांच्या माध्यमातून ‘एअरक्राफ्ट इंजिनिअर’ म्हणून नोकरी मिळवली. 

ध्येय निश्‍चित असेल आणि ते पूर्ण करण्यासाठी कष्ट करण्याची तयारी असेल तर काहीही अशक्‍य नसल्याचे सुहासने दाखवून दिले आहे. तो येथील मराठा कॉलनीत राहतो. त्याचे प्राथमिक शिक्षण महापालिकेच्या शाळा क्रमांक सातमध्ये, तर माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या जीवनकल्याण हायस्कूलमध्ये झाले. बारावी (विज्ञान शाखा)चे शिक्षण विवेकानंद महाविद्यालयातून घेतल्यानंतर सुहासने एअरक्राप्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंगसाठी पुण्यातील विंग्ज कॉलेज ऑफ एव्हिएशनमध्ये प्रवेश घेऊन ते पूर्ण केले. 

कत्तार एअरवेजमध्ये ‘एअरक्राप्ट इंजिनिअर’ पदासाठी जाहिरात होती. त्यासाठी सुहासने अर्ज केला. त्याची १० ऑक्‍टोबरला दोहा (कत्तार) येथे लेखी व तोंडी परीक्षा झाली. त्याचा निकाल २४ फेब्रुवारीला लागला. त्याचदिवशी त्याला कामावर हजर करून घेण्यात आले. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन जगातील प्रसिद्ध अशा कत्तार एअरवेजमध्ये नोकरी मिळविल्याबद्दल त्याचे अभिनंदन होत आहे. सुहासची आई गृहिणी, तर मोठा भाऊ कसबा बावडा येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक अकरामध्ये शिक्षक आहे. 

कल्पना चावलांकडून प्रेरणा
अंतराळवीर दिवंगत कल्पना चावला यांचे कार्य पाहून मला प्रेरणा मिळाली. बरेच विद्यार्थी रेग्युलर इंजिनिअरिंग करतात. पण, मला काहीतरी वेगळे करावेसे वाटले, म्हणून या क्षेत्राकडे वळलो. यासाठी मला माझे वडील दिवंगत श्रीमंत जाधव, आई श्रीमती सुशीला व भाऊ सुशील यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सुहासने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT