The suspect was immediately quarantined, where?
The suspect was immediately quarantined, where? 
पश्चिम महाराष्ट्र

त्या संशयिताला तत्काळ केले क्वारंटाईन, कुठे?

सकाळवृत्तसेवा

बागणी ः भोदोले (जि. कोल्हापूर) येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात आलेला बागणी - चांदोली वसाहत येथील तरुणाने 17 मे रोजी मुंबई ते तांदूळवाडीपर्यंत एकाच गाडीतून प्रवास केल्याची माहिती मिळताच तत्काळ रात्री त्याला इस्लामपूर (जि. सांगली) येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी प्रियांका राजमाने यांनी दिली. 

भादोले (जि. कोल्हापूर) येथील पॉझिटिव्ह आलेली महिला (ता. 17) मुंबईहून भोदोले या ठिकाणी आली होती. महिला, तिचे पती, बागणीतील तरुण, सातारा येथील एक व्यक्ती, अशा चौघाजणांनी एका खासगी गाडीने प्रवास केला.

भोदोले येथील महिला व पतीचा 17 मे रोजी सीपीआर रुग्णालयात स्वॅब तपासणीसाठी घेतला. शुक्रवारी पतीचा अहवाल निगेटिव्ह आला व त्याची पत्नी पॉझिटिव्ह आल्याने गावासह भागात एकच खळबळ उडाली आहे.

येथील संपर्कात आलेल्या तरुणाला ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासनाच्या सतर्कतेमुळे चांदोली वसाहतीमध्ये आल्यापासून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते; परंतु भोदोले येथील महिला पॉझिटिव्ह आल्याचे समजताच त्याला तत्काळ रात्री इस्लामपूर येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update:"राम कृष्ण हरी," म्हणत पंतप्रधानांचे सोलापुरातील भाषण सुरू

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

SCROLL FOR NEXT