पश्चिम महाराष्ट्र

जत तालुक्यात अपहरण झालेल्या चिमुकल्याचाही संशयास्पद मृत्यू

सकाळवृत्तसेवा

जत - अपहरण झालेल्या मुलीचा संशयास्पद मृत्यूचे प्रकरण काल (ता. ९) उघडकीस आले. तर वायफळ (ता. जत) येथेही अपहरण झालेल्या अडीच वर्षाच्या शिवराज दिगंबर यादव याचाही संशयास्यास्पद मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. सलग दुसरी घटना घडल्याने तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शिवराजचा मृतदेह घरापासून ३०० मीटरवर जवळच्या विहिरीत आज सकाळी आढळला. दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घेऊन जात असताना अचानक नातेवाईकांनी शिवराजचा चुलता व चुलती यांना शिवीगाळ सुरू केली. ‘तुझ्या बायकोनेच शिवराजचा खून केला, तिनेच शिवराजला विहिरीत टाकले’, आरोप करत चुलता संजय यादव यास मारहाण केली. मारहाण व दगडफेक सुरू होताच घटनास्थळी पोलिस आले. तातडीने एलसीबी पथक घटनास्थळी आले. त्यांनी तातडीने चुलता संजय याला पोलिस गाडीत घातले व जतला नेले. सरिताच्या नावाने जमाव शिवीगाळ करीत आक्रमक बनल्याचे लक्षात येताच पोलिसांनी जमावाची समजूत घालत सरितास ताब्यात घेत पोलिस ठाणे गाठले. दोघा पती-पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मृतदेह तरंगत होता
जत-सांगोला मार्गावर वायफळ हद्दीत सांगोला तालुक्‍यातील डिकसळ फाट्याजवळ रस्त्याकडेला यादवांच्या वस्त्या आहेत. अडीच वर्षाचा शिवराज शुक्रवारी (ता. ८) साडेबाराच्या सुमारास घराबाहेर खेळत होता. अचानक गायब झाला. सर्वत्र शोधाशोध केली. पण तो मिळाला नाही. त्यामुळे शिवराजची आई ज्योती यादव यांनी त्याचे अपहरण झाल्याची फिर्याद जत पोलिसांत दाखल केली. शिवराजचे वडील सैन्यात आहेत. सध्या ते हरियाणा येथे आहेत. आदल्या दिवशीच वज्रवाड येथून अक्षरा मठपती ही चौथीत शिकणारी मुलगी बेपत्ता झाली होती. दोन्ही मुलांचा कसून तपास सुरू असताना अक्षराचा मृतदेह घराजवळ विहिरीत आढळून आला. दोन दिवसागे बेपत्ता झालेल्या शिवराजच्या शोधासाठी पोलिस व नातेवाईकांनी पूर्ण परिसर पिंजून काढला. पोलिसांनी वायफळ परिसरातील विहिरीत, निर्जन ठिकाणी त्याचा शोध घेतला. तो मिळाला नव्हता. तपासासाठी तेजा व पिल्लू या श्‍वानाला पोलिसांनी पाचारण केले. दोन्ही श्‍वान घराभोवती घुटमळले. आज सकाळी शिवराजचे आजोबा शिवाजी यांनी घरातील हौद भरण्यासाठी मोटार चालू केली. थोड्या वेळाने बंदही केली. मोटार बंद होताच पाण्यात बुडबुडे आले. अचानक शिवराजचा मृतदेह पाण्यावर आला. बुडबुडे का येत आहेत म्हणून आजोबा शिवाजी यांनी डोकावून पाहिले असता त्यांना शिवराजचा मृतदेह दिसला. त्यांनी आरडाओरड केली.

संशयितांना चोप 
शिवराजचा मृतदेह विहिरीत सापडल्याचे समजताच नातेवाईक व जमावाने गर्दी केली. मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी जतला घेऊन जात असताना जमावाने अचानक शिवराजचा चुलता संजय यादव (हिवरे येथील शाळेत लिपिक आहेत) याला आरोप करीत शिवीगाळ व मारहाण सुरू केली. पोलिस उपनिरीक्षक वर्षा डोंगरे व पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण जमाव आक्रमक होता. काही तरी अघटीत घडणार अशी स्थिती निर्माण झाली असतानाच स्थानिक गुन्हा अन्वेषणची टीम पोचली. त्यांनी मारहाण थांबवून जमावाच्या ताब्यातून संजयची सुटका केली. जमाव संजयची पत्नी सारिका (वय ३२) च्या नावाने शिवीगाळ करीत होता. प्रसंगावधान राखून पोलिसांनी सारिकाला ताब्यात घेत पोलिस ठाणे गाठले. रात्री उशिरापर्यत दोघे पती, पत्नी पोलिस ठाण्यात होते.

बुडून मृत्यूचा अहवाल
जत ग्रामीण रुग्णालयात शिवराजचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुना नसून बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. पुढील तपासासाठी व्हिसेरा राखून ठेवल्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी सांगितले. जमावाकडून मारहाण होत असल्याने पोलिसांनी शिवराजचा चुलता संजय व चुलती सारिकाला सुरक्षेसाठी ताब्यात घेतले आहे. नातेवाईकांचा दोघांवर आरोप आहे. चौकशी सुरू असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

खून की...? 
शिवराजचा मृतदेह मिळून आल्यानंतर अंधश्रद्धेतून हा प्रकार झाल्याची चर्चा रंगली. तर काहीजण भावकीतील वादाचे कारण सांगत होते. मात्र पोलिसांनी कोणतीच माहिती दिली नाही. केवळ तपास सुरू असल्याचे सांगितले.

वज्रवाडचे धागेदोरे नाहीत
वज्रवाड (ता. जत)  येथील अपहरण झालेल्या अक्षरा सिद्धय्या मठपती (वय ९) या शाळकरी मुलीचा काल संशयास्पद मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्याबाबतही धागेदोरे मिळाले नाहीत. तिची डब्याची बॅग आणि सॅंडल अजूनही मिळाले नसल्याने तपासाला गती मिळाली नाही. त्यातच आज वायफळची घटना घडली. जत पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक ठाण मांडून तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT