पश्चिम महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यासाठी मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयासमोर स्वाभिमानीचे उपोषण 

हुकूम मुलाणी

मंगळवेढा - पंधरा दिवसांपूर्वी देण्यात आलेल्या निवेदनावर शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुका दुष्काळी जाहीर करावा व शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यासाठी मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.

या मागण्यामध्ये गतवर्षी खरीप पिकांचा पिकविमा देताना चुकीचे निकष लावत ओरीएंटल इंन्सुरन्स विमा कंपनीने तालुक्यावर अन्याय करत 53 हजार शेतकर्याना नुकसानभरपाई दिली नाही.सकारात्मक निर्णय घेण्याबाबत कृषी मंत्री सदाभाऊ खोकत यांनी दिलेले आश्वासनही वाया गेले. याबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा. साखर कारखान्याची पाच महिन्यांची थकित पगार कामगारांना मिळावी तसेच सन दोन हजार सतरा अठरा मधील ऊस बिलाची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावे व्हावी शेती पंपाच्या विजेचा कालावधी वाढवून मिळावा हुमनीमुळे तालुक्यात ऊस, कांदा, मका क्षेत्राचे मोठे नुकसान झाले या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्या द्यावी यंदा अल्प पर्जन्य झाल्याने खरीपाची पीके वाया गेली आहेत शिवाय रब्बी पिकाला पोषक वातावरण नसल्याने तो ही हंगाम अडचणीत आला. यापूर्वी मागणीचे निवेदन दिले 15 सप्टेंबररोजी संघटनेच्या वतीने दिले. जिल्हाधिकाय्राचा तालुका दौरा झाला पण अद्यापही निर्णय न घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी अखेर उपोषणाचे अस्त्र  उगारले.

या उपोषणात मतदार संघ अध्यक्ष अॅड राहुल घुले, तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, शंकर संगशेट्टी, मल्लिकार्जुन बिराजदार, मल्लिकार्जुन भांजे, अविनाश बनसोडे लक्ष्मण जमदाडे शिवलिंग भांजे, शांताप्पा कुंभार, लक्ष्मण सावंत प्रकाश भांजे रतनसिंग रजपूत हजरत मुल्ला कृष्ण कुमार बिराजदार गजानन पुजारी, मोहन बुध्याळकर, महेश देवकुरे, रवि कुंभार आदी सहभागी झाले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: पॉवर-प्ले कोलकाताच्या गोलंदाजांनी गाजवला, सलामीवीरांनंतर शाय होपदेखील परतला पॅव्हेलियनमध्ये

SCROLL FOR NEXT