mangalwedha
mangalwedha 
पश्चिम महाराष्ट्र

मंगळवेढ्यात तीन ऑक्टोबर पासून स्वाभिमानीचे उपोषण

हुकूम मुलाणी

मंगळवेढा - पंधरा दिवसांपूर्वी देण्यात आलेल्या निवेदनावर शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुका दुष्काळी जाहीर करावा व शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यासाठी मागण्यांसाठी तीन ऑक्टोबर पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाव्दारे तहसीलदार आप्पासाहेब समिंदर यांना दिला

या वेळी मतदार संघ अध्यक्ष अड राहुल घुले, तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, शंकर संगशेट्टी, आबा खांडेकर, बाळासाहेब कपले, आप्पासाहेब पाटील, रमेश चव्हाण, प्रशांत बिराजदार ,सुनिल कांबळे, सुनिल गरडे, आण्णासाहेब गरांडे, काशिनाथ बिराजदार, सिद्धेश्वर देवपूरे, महेश कांबळे, बबलू मुलाणी, ज्ञानेश्वर शिंदे, राहुल भोसले, आकाश पवार, रावसाहेब सपांगे ,महादेव येळगे, अमृत पवार, संजय चौगुले, अर्जुन संगशेट्टी, दत्ता मंडवे, भाउसाहेब गरडे आदी उपस्थित होते. 

गतवर्षी खरीप पिकांचा पिकविमा देताना चुकीचे निकष लावत ओरीएंटल इंन्सुरन्स विमा कंपनीने तालुक्यावर अन्याय करत 53 हजार शेतकर्याना नुकसानभरपाई दिली नाही.सकारात्मक निर्णय घेण्याबाबत कृषी मंत्री सदाभाऊ खोकत यांनी दिलेले आश्वासनही वाया गेले. याबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा.साखर कारखान्याची पाच महिन्यांची थकित पगार कामगारांना मिळावी तसेच सन दोन हजार सतरा अठरा मधील ऊस बिलाची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावे व्हावी शेती पंपाच्या विजेचा कालावधी वाढवून मिळावा हुमनीमुळे तालुक्यात ऊस, कांदा, मका क्षेत्राचे मोठे नुकसान झाले या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्या द्यावी यंदा अल्प पर्जन्य झाल्याने खरीपाची पीके वाया गेली आहेत शिवाय रब्बी पिकाला पोषक वातावरण नसल्याने तो ही हंगाम अडचणीत आला. यापूर्वी मागणीचे निवेदन दिले 15 सप्टेंबररोजी संघटनेच्या वतीने दिले. जिल्हाधिकाय्राचा तालुका दौरा झाला पण अद्यापही निर्णय न घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी 3 आक्टोबर पासून उपोषणाचा निर्णय घेतला .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT