abortion news 
पश्चिम महाराष्ट्र

गर्भपाताची खरी माहिती न देणाऱ्या पती-पत्नीवर कारवाई करा; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पहिली एक किंवा दोन मुली असणाऱ्या गरोदर मातेचा १२ आठवड्यांनंतर गर्भपात झाल्याचे निदर्शनास आल्यास, अशा महिलांच्या गर्भपाताबाबतची योग्य ती माहिती आरोग्य विभागामार्फत घ्यावी. या महिलेचा गर्भपात कोठे व कशामुळे झाला, याची खरी माहिती न देणाऱ्या पती- पत्नी व संबंधित कुटुंबीयांवर कायदेशीर कारवाई करा, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.

जिल्हास्तरीय दक्षता पथक समिती (पीसीपीएनडीटी) ची जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठक वेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ‘जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्र व गर्भपात केंद्रांची नियमित तपासणी करा. कोणत्याही केंद्रामध्ये पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन होत नसल्याची खातरजमा करून घ्या.

त्याचबरोबर सर्व सोनोग्राफी केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याची खात्री करा. सीसीटीव्ही नसणाऱ्या केंद्रांमध्ये तत्काळ सीसीटीव्ही बसवण्याची कार्यवाही करा. गरोदर महिलांची पहिल्या तिमाहीतील नोंदणी वेळेत होत असल्याची खात्री करा.

या सर्व नोंदीची माहिती खासगी सोनोग्राफी केंद्रधारकांनी आरोग्य विभागाला देणे आवश्यक आहे.’’ यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील, सीपीआरच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी उत्तम मदने, पीसीपीएनडीटी कायदा सल्लागार गौरी पाटील तसेच समिती सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT