karmala
karmala 
पश्चिम महाराष्ट्र

माजी आमदार जगतापांवरील खोटे गुन्हे मागे घ्या; अन्यथा आत्मदहन : आमदार पाटील

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीच्यावेळी झालेल्या हल्ल्यात माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यावर दाखल केलेला 307 चा खोटा गुन्हा मागे न घेतल्यास सामुहीक आत्मदहन करण्याचा इशारा शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांच्या यांनी दिला.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडीवेळी मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल व नुतन सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर यांच्यावर झालेल्या हल्लानंतर पोलिसांवर दबाव आणुन 307 चे कलम लावल्याचा आरोप आमदार नारायण पाटील यांचा आहे.
जगताप यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावे, यासाठी आज (ता. 12) करमाळा तहसील कार्यालयासमोर  आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष दादासाहेब लबडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे, पंचायत समितीचे सभापती शेखर गाडे, उपसभापती गहिनीनाथ ननावरे, जिल्हा परिषद सदस्या सविताराजे भोसले, हमाल पंचायतीचे अध्यक्ष अँड. राहुल सावंत, बिबिषण आवटे, महेंद्र पाटील, डाॅ. अमोल घाडगे, तात्यासाहेब गोडगे यांच्यासह पाटील व जगताप गटाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, सभापती निवडीच्यावेळी जी भांडणे झाली त्याचे मी समर्थन करणार नाही, मात्र याप्रकरणात जयवंतराव जगताप यांचे नाव ओवले गेले. त्यांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी बागल गटाने पोलिस यंञणेवर फ्लॅन करून, दबाव आणुन 307 चा गुन्हा दाखल करायला लावला. केवळ स्टटंबाजी, सहानभुती मिळावी म्हणुन हे कृत्य केले आहे. पोलिस अधिकार्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता तपास करावा व वस्तुस्थितीनुसार कारवाई करावी, येत्या शुक्रवारार्यंत खोटे गुन्हे मागे घेतले नाहीत तर करमाळा पोलिस स्टेशन समोर हजारो कार्यकर्त्यांसह सामुहीक आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT