Talathi does not provide certificates, banks do not pay insurance
Talathi does not provide certificates, banks do not pay insurance 
पश्चिम महाराष्ट्र

तलाठी दाखले देत नाही, बँका विमा भरून घेत नाही

नागेश गायकवाड

आटपाडी : विमा कंपन्यांनी डाळिंब विमा भरण्यासाठी तलाठी दाखल्याची अट घातली आहे. तर न्यायालयाच्या आदेशामुळे तलाठ्यांना कोणतेही दाखले देता येत नाहीत. यामुळे या वर्षी एक टक्काही शेतकऱ्यांना विमा भरता आला नसून तलाठी दाखल्याने डाळिंब विमा भरण्याला खोडा बसला आहे.   

डाळिंबाचा मृग बहार सुरू झाला आहे. याचा विमा भरण्याची अंतिम मुदत पंधरा जुलै आहे. मृग बहार मोठ्या संख्येन धरला जातो. अनेक शेतकऱ्यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. डाळिंब विमा भरण्यासाठी शेतकऱ्यात जागृती झाली आहे. मात्र विमा कंपन्यांनी विविध कागदपत्रे आणि अटी घातल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना विमा भरण्याला खोडा घातले आहे. यामुळे एक टक्काही शेतकऱ्याना विमा भरता आलेला नाही.

विमा कंपन्यांनी विविध कागदपत्रासह डाळिंब लागवडीचा तलाठी दाखल्याची अट घातली आहे. दुसरीकडे तलाठयांना दाखले देण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. त्यामुळे डाळिंब लागवडीचे दाखले मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा विमा बँका भरून घेत नाहीत.  उताऱ्यावरील लागवडीवर शंका उपस्थित केल्या जातात. बँका तलाठी दाखलाच मागत आहेत. कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकाऱ्याचे दाखले स्वीकारला जात नाहीत. यामुळे डाळींब विमा भरण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

विम्यासाठी लागणारी कागदपत्रे
विमा फॉर्म. 7/12 उतारा. लागवडीचा दाखला. आधार ओळखपत्राची झेरॉक्स. मतदान ओळखपत्राची झेरॉक्स. बँक पासबुक. इनबॉक्स-आटपाडीतील डाळिंब लागवडीचे क्षेत्र- 9000 हेक्टर. शेतकरी संख्या-10,000. हेक्टरी विमा रक्कम-6000. विम्याची अंतिम मुदत-15 जूलै. 

तलाठी दाखले देत नाहीत तर बँका दाखल्याशिवाय विमा भरून घेत नाहीत. यावर मागॅ काढावा
दत्तात्रय गायकवाड (शेतकरी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT