सातारा - ज्योती माळी यांनी इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली दिनदर्शिका.
सातारा - ज्योती माळी यांनी इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली दिनदर्शिका. 
पश्चिम महाराष्ट्र

शिक्षिकेने केली नावीन्यपूर्ण दिनदर्शिका

सकाळ वृत्तसेवा

नागठाणे - दै. ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या सुटीच्या कॅलेंडरपासून प्रेरणा घेत प्राथमिक शिक्षिकेने इयत्ता दुसरीची नावीन्यपूर्ण दिनदर्शिका तयार केली आहे. नव्या अभ्यासक्रमाच्या पार्श्वभूमीवर ती शिक्षक, पालक अन्‌ विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारी आहे.

सौ. ज्योती दीपक माळी असे या शिक्षिकेचे नाव आहे. त्या सातारा शहरालगत असलेल्या गोळीबार मैदान येथील प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत.

उपक्रमशील, कृतिशील शिक्षिका असा त्यांचा लौकिक आहे. नुकतीच त्यांनी इयत्ता दुसरीच्या नवीन अभ्यासक्रमाची वर्षभराची सर्वांना संग्राह्य ठरेल, अशी दिनदर्शिका तयार केली आहे. त्यासाठी दै. ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेले सुटीचे कॅलेंडर ही खरीखुरी प्रेरणा ठरल्याचे सौ. माळी नमूद करतात. ‘सुटीच्या त्या अनोख्या कॅलेंडरमध्ये मुलांसाठी दिवसनिहाय नियोजन करण्यात आले होते. त्याच धर्तीवर आपणही काही तरी करावे, असा विचार डोकावला. उन्हाळी सुटीत हाताशी वेळ होता.

विचार करायला फुरसत होती. त्यातून या दिनदर्शिकेने आकार घेतला. ही रंगीत, चित्रमय, लक्षवेधक दिनदर्शिका जून ते मार्च अशी दहा पानांची आहे. त्यात कृती, खेळ, अभ्यास, सराव परीक्षा अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.

तो शिक्षक, पालक तसेच विद्यार्थ्यांसाठी विशेष उपयोगी ठरणारा आहे. या कामी पती दीपक माळी यांच्यासह गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे, चंद्रकांत कर्णे, केंद्रप्रमुख उज्ज्वला कुलकर्णी तसेच सहकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT