blazer.jpg
blazer.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

मंगळवेढ्यात ब्लेजरमुळे शिक्षकांची धावपळ

हुकूम मुलाणी

मंगळवेढा : सोलापूर जिल्हा परिषदेने प्राथमिक शिक्षकांसाठी गणवेश सोबत ब्लेजर घालण्याचा निर्णय घेतल्याने आणि ब्लेजर न वापरणाऱ्या शिक्षकांच्या सेवा पुस्तकावर लाल शेरा मारण्याच्या भूमिकेमुळे मंगळवेढ्यातील शिक्षक सध्या ब्लेजर खरेदीसाठी धावपळ करताना दिसत आहेत

मागील दोन महिन्यांपासून गुरुजींचा ड्रेसकोड व ब्लेझरचा मुद्दा गाजत आहे. काहीही झाले तरी ब्लेझर घालावाच लागेल, अशी भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी घेतली आहे. मात्र, त्याला जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांची भेट घेतली होती. पण, त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचे डॉ. भारुड यांनी घेतलेल्या भूमिकेवरून दिसून येते. त्यामुळे शिक्षकांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निर्णयाच्या मागे जायचे की प्रशासनाचा निर्णय ऐकायचा याचा पेच पडला असून यातील काही शिक्षकांनी विशेषतः महिला शिक्षकांनी शुक्रवारपासून मंगळवेढा, चडचन, सांगोला, सांगली या भागात कुठे ब्लेजर मिळतील तिथून ब्लेजर खरेदीचा सपाटा चालू केला आहे. या निर्णयामुळे कपडे विकणाऱ्या दुकानदारांना अचानक ब्लेजरची मागणी वाढल्याने ब्लेजर उपलब्ध करून देता येत नाही आणि प्रशासन व संघटना यांच्या वादात ब्लेजर लागू होईल किंवा न होईल या संदिग्ध भूमिकेमुळे दुकानदाराने ब्लेजरची ऑर्डर दिली नाही.

 मोबाईलवर बातम्या वाचण्यासाठी सकाळचे अॅप डाऊनलोड करा

सध्या मंगळवेढ्यातील अनेक शिक्षकांनी पुणे येथे ब्लेजर उपलब्ध होतात का ह्याबाबत आपले नातेवाईक आप्तेष्ट यांच्याकडे चौकशी सुरू केली असून तालुक्यात जवळपास 700 प्राथमिक शिक्षक आहेत आणि सोमवारी अंगावर ब्लेजर असणे आवश्यक असल्याने सध्या प्राथमिक शिक्षकांसमोर मोठी तारांबळ उडाली आहे. बाजारपेठ एवढे ब्लेजर उपलब्ध नसल्याने काय करावे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे  डॉ. भारुड यांनी ब्लेझर घालावाच लागेल, अशी भूमिका घेतल्याने संघटनेच्या नेत्यांची पंचाईत झाली आहे. काही शिक्षकांची ब्लेजर घालायची तर इच्छा आहे मात्र उपलब्ध नाही अशी स्थिती झाली आहे. 

जर ब्लेजर घालावाच लागणार असेल तर ब्लेजरच्या उपलब्धतेसाठी काही दिवसांची मुदतवाढ मिळावी अशी अपेक्षा गुरुजींकडून व्यक्त होत आहे याबाबत संघटना काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT